जुन्नर तालुक्यातील निसर्ग खजिना…

जुन्नर तालुक्यातील निसर्ग खजिना.

आज प्रथमतःच जुन्नर तालुक्याचा संपूर्ण निसर्ग खजिना वाचकांसमोर उजागर करताना (श्री. खरमाळे रमेश,माजी सैनिक खोडद )मला अत्यानंद होत आहे. तालुक्याला निसर्गाच लाभलेल वैभव टिपताना खुप समाधान लाभले. पर्यटक नेहमीच कमेंटद्वारे विचारत असत की एवढ काय आहे जुन्नर तालुक्यात? त्यांची जाणून घ्यायची उत्सुकता व इच्छा आज पुर्ण करताना व ती आज अनेक पर्यटकांसमोर मांडताना हा निसर्ग खजिना त्यांना आनंद लुटण्यासाठी समर्पित करत आहे. निश्चितच भविष्यात या खजिन्याचा उपयोग पर्यटकांना माहीती पूर्ण ठरेल अशी आशा व्यक्त करतो.

क) निसर्ग सौंदर्याने नटलेले सात किल्ले :-
1) किल्ले शिवनेरी- (जुन्नर )
2) किल्ले नारायणगड – (खोडद)
3) किल्ले चावंड -( चावंड गाव)
4) किल्ले जिवधन -( घाटघर )
5) किल्ले निमगिरी -(निमगिरी गाव)
6) किल्ले हडसर – (हडसर गाव)
7) किल्ले सिंदोळा -(मढ, पारगाव )

ख) लेणी समुह कोणते व कोठे आढळून येतात:- भारतातील जुन्नर तालुका एकमेव असा तालुका आहे की येथे सर्वाधिक 260 लेण्या पहावयास मिळतात.
1) अंबा अंबिका लेणी (खोरे वस्ती जुन्नर )
2) शिवनेरी किल्ला लेणी (जुन्नर )
3) तुळजाभवानी लेणी (पाडळी)
4) लेण्याद्री विनायक लेणी( लेण्याद्री )
5) सुलेमान लेणी ( लेण्याद्री )
6) चावंड लेणी (चावंड गाव)
7) हडसर लेणी ( हडसर गाव)
8) निमगिरी लेणी ( निमगिरी गाव)
9) प्रसिद्ध नाणेघाट लेणी ( घाटघर)
10)खिरेश्वर लेणी समूह (खिरेश्वर )
11)जीवधन लेणी समुह (घाटघर)

ग) तालुक्यातील प्रसिद्ध मंदिरे:-
1) अष्टविनायक मंदिरे:-
i) गिरीजात्मक – लेण्याद्री
ii) विघ्नेश्वर – ओझर
2) हेमाडपंथी बांधणीतील कोरीव पुरातन मंदिरे :-
i) नागेश्वर मंदिर – खिरेश्वर
ii) कुकडेश्वर मंदिर – कुकडेश्वर
iii) अर्ध पीठ काशी ब्रम्हनाथ मंदिर – पारूंडे
3) संत समाधी मंदिर :-
i) संत ज्ञानेश्वर वेद प्रणित रेडा समाधी- आळे
ii) संत रंगदास स्वामी समाधी – आणे
iii)चैतन्य महाराज समाधी – ओतुर
4) इतर महत्वाची मंदिरे:-
i) पंचलींग मंदिर – जुन्नर
ii) पाताळेश्वर मंदिर – जुन्नर
iii) उत्तरेश्वर मंदिर – जुन्नर
iv) खंडोबा मंदिर (कुलदैवत) – वडज
v) रेणुका माता मंदिर -निमदरी
vi)गुप्त विठोबा प्रति पंढरपूर मंदिर, – बांगरवाडी
viii) वरसुबाई माता मंदिर – सुकाळवेढे
ix) दुर्गादेवी मंदिर – दुर्गवाडी
x) कपर्दिकेश्वर मंदिर – ओतुर
xi) जगदंबा माता मंदिर – खोडद
xii) मारूती मंदिर(माता जिजाऊ निर्मीत
– निरगुडे
xiii)खंडोबा मंदिर(कुलदैवत) – धामणखेल
5) निसर्गच्छादित निसर्गमय मंदिर – हटकेश्वर

घ) प्रसिध्द निसर्ग रम्य घाट :-
i) पुरातन व्यापारी मार्ग असलेला नाणेघाट – घाटघर
ii) माळशेज घाट – कल्याण – मुंबई महामार्ग
iii)दार्याघाट – आंबोली
iv) आणेघाट – आणे
v) लागाचा घाट
vi) म्हसवंडी घाट
vii)इंगळुन घाट
viii)हिवरे मिन्हेर घाट

च) प्रसिद्ध धबधबे :-
i) आंबोली
ii) नाणेघाट
iii)माळशेज
iv)इंगळुन
v) हातवीज
vi)दुर्गादेवी

छ) प्रसिद्ध नद्या.
i) मीना नदी व उगमस्थान आंबोली
ii) कुकडी नदी व उगमस्थान कुकडेश्वर
iii) पुष्पावती नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
iv) काळू नदी व उगमस्थान हरीश्चंद्र गड
v) मांडवी नदी व उगमस्थान फोपसंडी अ.नगर

ज) प्रसिद्ध धरणे:-
i) येडगाव धरण – कुकडी नदी
ii)वडज धरण – मीना नदी
iii)माणिकडोह धरण – कुकडी नदी
iii)पिंपळगाव जोगा धरण – पुष्पावती नदी
iv)चिल्हेवाडी धरण – मांडवी नदी

झ)प्रसिद्ध विहीरी :-
i) बाराबावडी – जुन्नर
ii) कुंदलबावडी – जुन्नर
iii) आमडेकर विहीर – पाडळी

ट) प्रसिध्द खिंडी
i) गणेश खिंड
ii)मढ खिंड
iii)टोलार खिंड
iv)आळे खिंड

ठ) ऐतिहासिक वास्तू :-
i) सौदागर हाबसी घुमट – हापुसबाग
ii) 300 वर्षे जूना मलिकांबर बाराबावडी
पाणीपुरवठा योजना जुन्नर शहर.
iii) नवाब गढी – बेल्हे
iv) गिप्सन निवास व समाधी.

ड) जुन्नर येथील दगड वाजतात घंटे सारखे. हे एक खुप मोठे आश्चर्य आहे. हे दगड आंबे या गावच्या पश्चिमेस अगदी 200 मी. अंतरावर आहेत. व बाकिचे दगड दुर्गादेवी किल्ले टाॅपवर आहेत.

ढ) जागतीक केंद्र :-
i) जागतिक महादुर्बिण – खोडद
ii) विक्रम दळणवळण उपग्रह – आर्वी

ण) पठार :-
i) आंबे हातवीज पठार
ii) नळावणे पठार
iii) कोपरा मांडवे पठार

त) गिर्यारोहकांना आव्हान देणारे दोन ते तीन हजार फुट खोल असलेले कोकणकडे.
i) नाणेघाट
ii) माळशेज
iii)दार्याघाट
iv)ढाकोबा
v) दुर्गादेवी
थ) प्रसिध्द रांजण खाचखळगे:-
i) माणिकडोह गावातील कुकडी नदीवर
ii) निघोज

द) दहा लाख अधिक वर्षापुर्वी भुकंप झालेल्या उद्रेकाची राख आजही पहावयास मिळते. याचे संदर्भ प्र. के. घाणेकर सर व डेक्कन काॅलेज रिपोर्टमध्ये वाचावयास मिळतो. – बोरी गाव

ध) प्रसिद्ध कारखाने :-
i) कागद कारखाने – जुन्नर
ii) विघ्नहर सहकारी साखर कारखाना – ओझर
iii) इतर अनेक नवनिर्मित कारखाने

न) कृषी पर्यटन.
i)पराशर कृषी पर्यटन केंद्र – राजुरी
ii) आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र – गोळेगाव, जुन्नर
iii)विना वर्ल्ड टुरीझम – नारायणगाव
iv) हचिको टुरीझम – राजुरी
v) पर्णकुटी कृषी पर्यटन केंद्र – आळेफाटा

प) तमाशा पंढरी – नारायणगाव
या मंचाच्या माध्यमातून अनेक लोक कलाकारांचा जन्म जुन्नर तालुक्यात रसिकांच्या गोडीतुन झाला व पाहाता पाहता देशात तमाशा केंद्र म्हणून नारायणगाव शहराला मान मिळाला. येथे अनेक तमाशा कलाकार स्व कलाकृतीद्वारे समाजासमोर आले. व त्यातुन अनेक नवनवीन तमाशा फड उभे राहिले. व राष्ट्रपती पारीतोषीक विजेते ठरले.
प्रसिध्द तमाशा कलाकार जुन्नर तालुका.
i) सौ.विठाबाई नारायणगावकर – नारायणगाव
( राष्ट्रपती पारीतोषक)
ii) दत्ता महाडिक – बेल्हे
iii)मंगला बनसोडे – नारायणगाव
iv) मालती इनामदार – नारायणगाव
v) पांडुरंग मुळे – मांजरवाडी
vi)दत्तोबा तांबे – बोरी, शिरोली

फ) तालुक्यातील प्रसिद्ध सिने कलाकार, लेखक व अन्य क्षेत्र.
i) श्री.आशोक हांडे – उंब्रज
ii) डाॅ. आमोल कोल्हे – नारायणगाव
iii) सौ.नम्रता आवटे/संभेराव – राजुरी
iv) कु.शरद जोयेकर – राजुरी
v) श्री.मंगेश हाडवळे – राजुरी
vi) श्री.सुभाष अवचट – ओतुर
vii) श्री.अनिल अवचट – ओतुर
viii)श्री. दत्ता पाडेकर – आळे
ix) राजन खान – ओतुर
x) सौ. शुभांगी लाटकर – राजुरी
xi श्री. अंकुश चौधरी – खोडद

ब) जिल्हय़ातील प्रथम सिनेमा गृह:-
i) शिवाजी थिएटर – जुन्नर
आणि दुसरे सिनेमा गृह “आर्यन” हे पुण्यात होत.

भ)आशियातील सर्वात पहीली वायनरी – चातो इंडेज चौदानंबर येथे पुणे नाशिक महामार्गानजदिक श्री.शामराव चौघुले यांनी उभारली .

म) बिबटय़ा निवारण केंद्र – माणिकडोह(जुन्नर ) येथे उभारण्यात आले.

य) खाद्य संस्कृती :-
i) आण्याची आमटी
ii) जुन्नरची मासवडी ,लसूण चटणी, मटण /
चिकन भाकरी , मटकी भेळ
iii)राजुरी चा किसनदादा पेढा

र) नैसर्गिक पुल
i) आणे घाटातील नैसर्गिक पुल
ii) हटकेश्वर डोंगरावरील नैसर्गिक पुल.

ल) आठवडे बाजार
आजही 350 वर्ष परंपरेचा इतिहास असलेला आठवडे बाजार सोमवारी बेल्हे गावचा पहावयास मिळतो. खरेदी विक्री साठी हजारो व्यापारी आणि ग्राहक येथे यात्रेच्या स्वरूपात पहावयास मिळतात. या दिवशी शाळेस सुट्टी असते व रविवारी शाळा भरते. येथील सर्वात प्रसिद्ध मानला जातो तो बैल बाजार या बाजारात प्रत्येक सोमवारी दोन ते अडीच हजार बैलांचा खरेदी विक्रीचा एकाच दिवशी व्यापार चालतो.

व) देशाच्या पर्यटन नकाशावर कोरले गेले जुन्नर तालुक्याचे नाव.
सन 2012 मध्ये भारत सरकारने देशातील दहा ग्रामीण भागांची पर्यटनासाठी अनेक ठिकाणाहून माहीती मागविण्यात आली होती. आपल्या जुन्नर तालुक्याची माहिती हचिको टुरीझम राजुरी चे संस्थापक – श्री मनोज हाडवळे यांच्या मार्फत देण्यात आली होती. ही माहिती खुप वैचारिक रित्या मांडण्याचा प्रयत्न केला गेला. व या दहा ग्रामीण भागातून पर्यटनासाठी प्रथम क्रमांक पटकाविला तो आपल्या जुन्नर तालुक्याने. आणि त्याच दिवशी देशाच्या पर्यटन नकाशावर तालुक्याचे नाव कोरले गेले.

श) जुन्नर तालुक्यातील साहित्यिक
श्री.ग.ह.पाटील
श्री. शंकर इनामदार
श्री. शंकर वैद्य
श्री. स.दा.डुंबरे
श्री. अनिल अवचट
श्री. सुभाष अवचट
श्री. मनोहर घोलप
श्री. द.स.काकड़े
श्री. शिवाजी चाळक
श्री. जयसिंग गाडेकर
श्री. कविकुमार
श्री. राम लोखंडे
सौ.. माधुरी पानसरे
डॉ .आनंद सराईकर
श्री. संदीप वाघोले
श्री. बाबासाहेब जाधव
श्री. उत्तम सदाकाळ
सौ. मंगल सासवडे

स) आमदार जुन्नर तालुका

1) श्री. दत्तात्रय ढोबळे – १९५२
2) श्री. शिवाजीराव काळे – १९५७
3) श्री. विठ्ठलराव नारायणराव आवटे – १९६२
4) श्री.डी.आर.काकडे – १९६७
5) श्री.कृष्ण रामजी तांबे – १९७२
6) सौ.लताबाई श्रीकृष्ण तांबे – १९७३
7) श्री. कृष्णराव मुंढे – १९७८
8) श्री. दिलीप ढमढेरे – १९८०
9) श्री.वल्लभ बेनके – १९८५
10) श्री.वल्लभ बेनके – १९९०
11) श्री. बाळासाहेब दांगट – १९९५
12) श्री.बाळासाहेब दांगट – १९९९
13) श्री.वल्लभ बेनके – २००४
14) श्री. वल्लभ बेनके – २००९
15) श्री.शरददादा सोनवणे – २०१४

मित्रांनो पर्यटन विकासासाठी जे हवय ते वैभव तालुक्याला नैसर्गिक रित्या खुप लाभलय. येथील चाली रिती, रूढी परंपरा पाहण्या व जोपासण्या योग्य आहेत. सह्याद्री पर्वताची तालुक्यातील रांगाची उधळण म्हणजे एक वरदानच आहे. येथील आदिवासी संस्कृती विविधतेने नटलेली पहावयास मिळते. येथील इतिहास शब्द न उच्चारताच जगाला तालुक्याची ओळख करून देतो. येथे जन्मलेला जाणता राजा श्री.छत्रपती शिवाजी महाराज यांची हीच ती पदस्पर्श पावन भुमी. कि ज्यांनी जगात इतिहास घडविला त्या भुमीचा निसर्ग कसा असेल त्याचे वर्णन व रूप कसे असेल हे शब्दात सांगणेच कठीण आहे.
सिनेमासृष्ठीची नजर या भुमी वर पडताच अनेक चित्रपटांचे चित्रिकरण या भुमीत आज होत आहे. परंतु त्यास प्रसिद्धी पासुन वंचित का ठेवले जात आहे तेच समजले नाही.
गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पर्यटकांची तीन पटीने वाढलेला ओघ येथील रहिवासी सांगतात. त्या साठी ” निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज, जुन्नर पर्यटन विकास संस्था तसेच तालुक्यातील किल्ले संवर्धक ” शिवाजी ट्रेल ” आणि निसर्ग प्रेमी पत्रकार बंधू शक्य आहे तेवढे काम करत आहेत. व त्याचा प्रसार मिडीया व दैनिकांच्या माध्यमातून वाचकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करत आहेतच. ते ही कुठल्याही अपेक्षा न ठेवता.
छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका