काल जंगल भागात भटकंती करत असता रामेठा वनस्पती शेजारून जात होतो व सहज रामेठा वनस्पतीच पान तोडले तर मी अचानक डचकलोच कारण त्याच झुडपातुन भर्र…आवाज करत रान होला पक्षी उडून गेला.क्षणार्धात मनी एक प्रश्न स्पर्श करून गेला कि नक्कीच या ठिकाणी या पक्षाचे घरटे असावे. त्या प्रश्नाचे उत्तर सापडण्यासाठी जास्त वेळ पण लागला नाही. उत्तर तर समोर होतच. परंतु रान होला पक्ष्याची दोन सुंदर पिल्ले त्या घरट्यात पाहुन खुपच आनंद झाला. अगदीच चार ते पाच दिवसाची अंगावर कोवळे भुरके केस असलेली व चाहुल लागल्याने डोळ्याची उघडझाप करत व शांत व कदाचित पोट भरलेले असल्याने ते तशीच पहुडलेली सुंदर दिसत होती. त्यांना कुठलाही स्पर्श न करता त्याच स्थितीत निरोप घेतला व पुढील प्रवास सुरू केला.
छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद )