Category Archives: पक्षी संपदा

हळद्या पक्षी.(पक्षी संपदा जुन्नर)

हळद्या पक्षी.(पक्षी संपदा जुन्नर)
आढळ – हिवरे तर्फे नारायणगाव (पेट्रोल पंपाच्या दक्षिणेस झाडावर)
वेळ – सकाळी 8:00
दि. -15 मे 2016
वार – रविवार

मराठीत भाषेत या पक्षाला हळद्या, पिलक अशी नावे आहेत. हा पक्षी संपूर्ण भारत देशभर आढळतो. इंग्रजीमध्ये गोल्डन ओरिओल (Golden Oriole) तर शास्त्रीय नाव Oriolus oriolus अशी याची ओळख आहे .

नर हळद्या गर्द पिवळ्या रंगाचा असून याच्या उडत्या पंखांचा रंग काळा असतो तसेच याच्या डोळ्याजवळ काळ्या रंगाची पट्टी असते.जणु काय त्याने काजळच घातले आहे कि काय अस दिसत. मादी नरासारखीच पण किंचित फिक्या पिवळ्या-हिरव्या रंगाची असते. झाडांवर एकट्याने किंवा जोडीने हे आढळतात. झाडांच्या फांद्यांवर हा सहजासहजी शोधने कठीणच आहे, त्याच्या मधुर वाणिनेच आपण त्यास ओळखू शकतो.

खाद्य –
फुलांमधील मध, विविध फळे आणि लहान किडे हे याचे अवडीचे खाद्य. याचे घरटे लहान, कपच्या आकाराचे गवत, कोळ्याच्या जाळ्याने व्यवस्थीत विणलेले असते. विणीचा हंगाम एप्रिल ते जुलै असा असून मादी एकावेळी २ ते ३ पांढर्‍या रंगाची अंडी देते. पिलांचे संगोपनाची सगळी कामे नर मादी दोघे मिळून करतात.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

13239965_1703205726600865_3606872236160745726_n 13227004_1703205759934195_6150613329526674006_n

पक्षी संपदा जुन्नर “काळा अवाक”

पक्षी संपदा जुन्नर

काळा अवाक
शास्त्रीय नाव: Pseudibis papillosa, स्यूडिबिस पॅपिलोसा ;
इंग्लिश: Red-naped Ibis / Black Ibis, रेड-नेप्ड आयबिस / ब्लॅक आयबिस ही अवाकाद्य पक्षिकुळातील दक्षिण आशियात आढळणारी एक प्रजाती आहे. हे पक्षी साधारण ६८ सें.मी. आकारमानाचे असतात. यांचा मुख्य रंग विटकरी काळा असून, चोच तपकिरी रंगाची आणि बाकदार असते. यांच्या खांद्यावर ठळक पांढरा भाग असतो. डोक्यावर पिसांचा अभाव असून डोक्याचा मुख्य रंग काळा, तर त्यावर मागील बाजूस साधारण त्रिकोणी आकाराचा ठळक लाल तुरा असतो. काळ्या अवाकांत नर व मादी दिसायला सारखेच असतात.

आढळ

हे पक्षी दक्षिण आशियात आढळतात. भारताच्या मुख्य भूमीत, कोरड्या हवामानाच्या प्रदेशात हा पक्षी सर्वत्र आढळत असून तो पाकिस्तानामध्येही आढळतो. बांगलादेशामध्ये याची वेगळी उपजात आढळते.

नद्या, तलाव, भातशेतीच्या प्रदेशात तसेच दलदली भागात राहणे याला पसंत असले तरी हा पांढर्‍या अवाकाएवढा पाण्यावर अवलंबून नसतो. काळा अवाक पाण्याजवळच्या भागातही आपले खाद्य शोधत फिरतो. सहसा एकाच प्रदेशात राहणे याला पसंत आहे, हा आपला ठरलेला प्रदेश सोडून अन्यत्र जात नाही. काळा अवाक जोडीने किंवा छोट्या थव्यात राहणे पसंत करतो. बगळ्यांसारखे काळे अवाकही सकाळ-संध्याकाळ एकाच झाडावर किंवा उंच ठिकाणी एकत्र जमतात आणि मोठा कलकलाट करतात.

खाद्य

उथळ पाण्यात चोच बुडवून एकट्याने आणि लहान-मोठ्या थव्याने हे पक्षी दिवसभर खाद्य शोधत फिरतात. सरडे, गोगलगाय, बेडूक, मासोळ्या, खेकडे वगैरे पाण्यात राहणारे जीव काळ्या अवाकांचे खाद्य आहे.

प्रजनन

मार्च ते ऑक्टोबर हा या पक्ष्याचा विणीचा काळ असून याचे घरटे मोठे, काटक्या, पिसे वगैरे वापरून केलेले असते. पाण्यापासून दूरच्या उंच झाडावर अवाक आपले घरटे बांधतो किंवा इतरांनी सोडून दिलेले आयते घरटे वापरतो. याचे घरटे झाडावर इतर पक्ष्यांसोबत असते. मादी एकावेळी २ ते ४ फिकट हिरव्या रंगाची त्यावर तपकिरी ठिपके असलेली अंडी देते.
छायाचित्र :-श्री. खरमाळे रमेश
छायाचित्र :-वडज धरण (जुन्नर)
(माजी सैनिक खोडद)
मो. नं. 8390008370

12524125_1686663161588455_1231779312583814147_n 12920505_1686663151588456_1679326548975265503_n 12936752_1686663108255127_5427904319001394821_n