Category Archives: पक्षी संपदा

सुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र

सुराळे (जुन्नर) येथे टिपलेले चातकाचे छायाचित्र.
छायाचित्र – श्री रमेश खरमाळे
शिवनेरी भुषण
माजी सैनिक
८३९०००८३७०

 

अडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.

अडीच वर्षे वय असलेल्या बालवाडीतील मुलीमुळे वाचले दोन जीव.
सकाळी सकाळी नुकताच अंघोळ करून बसलो होतो. तेवढ्यात मोबाईल वर श्री. संजय गर्भे यांची काॅल रिंग वाजू लागली. मोबाईल रिसिव्ह केला तर बोलले घुबड पक्षाचे पिल्लू शाळेच्या वरांड्यात पडलेले आहे. येताय का? मी हो म्हटले व लगेच 10 मीनीटांत बेलसरला पोहचलो.पिल्लाची परिस्थिती पाहिली तर पिल्लू अगदीच खाली मान टाकलेल्या अवस्थेत होते. परंतु जखम कूठेच दिसत नव्हती. बहुतेक 20 /25 मुलांनी गराडा घातल्यामुळे घाबरले असावे असा तर्क केला. कोणत्या मुलाने पाहिले याला मी विचारले तर कु.वर्षना देवदत्त ताजणे या अडीच वर्षे वयातील बालवाडीच्या मुलीने पाहिले समजले. जवळच सौ शैलजा गर्भे व सौ छाया अरगडे या मुलांच्या शिक्षिका होत्या. त्यांनी मुलांना एकत्र करून पक्षांची माहिती देण्याचा मला आग्रह केला. मी माहीती देण्याआधी प्रथम खिशात 20 रू होते ते काढत कु.वर्षना देवदत्त ताजणे या मुलीस सर्वांसमक्ष बक्षीस म्हणून दिले. आणि बोललो छान काम केलेस बेटा. पक्षी हे आपले मित्र असतात. त्यांना कधीच मारायचे नसते. अश्या घायाळ झालेल्या पक्षांना नेहमीच जीवदान द्यायचे असते. कारण याच पक्षांमुळे पृथ्वी तलावर लाखो झाडे लावली जातात. मानव झाडे तोडतो व हे पक्षी मात्र फळे खातात व त्यांच्या विष्ठेतुन या फळांच्या बिया इतरत्र पसरतात व पाऊस पडला कि या बिया उगवतात तीच झाडे आपणास न लावता इतरत्र दिसतात. या शाळेत बहुतांशी मुले ठाकर समाजातील असल्याने त हा संदेश देणे खुप गरजेचे होते.
वर्षनाला ज्या ठिकाणी हे पिल्लू दिसले त्या ठिकाणी संजयजी गर्भे यांना दुसरे पिल्लू असल्याचे निदर्शनास आले. ते पण तेथेच उभे होते. डाॅ. अजय देशमुख यांना फोन करत असतानाच त्या पिल्लांची आई झाडावर दिसली. जीवाच्या आकांताने ओरडत होती. दु:ख कुणाला सांगणार ती. एक बाळ मरनासन्न होते तर दुसरे आईच्या कुशीत जाण्यासाठी धडपडत होते. आई मात्र आक्रोश करत होती. या झाडावरून त्या झाडावर फिरताना दिसत होती. दोन्ही पिल्ले मी एकत्र ठेवली होती व बाजुला जाऊन त्यांना आई घेऊन जाईल म्हणून वाट पाहू लागलो.
आता आईचा आवाज जोरातच येऊ लागला. मी जाऊन पाहिले तर मांजर या पिल्लांकडे पाहून हळु हळु पुढे शिकारीसाठी सरकत होती. त्या मांजरीला हुसकावून लावत ती पिल्ले उचलत पुन्हा उंच टाकीवर मी आणि संतोष बिरादार आम्ही ठेवली. त्या पिल्लाच्या आईला धिर आला असावा. कारण तीचा आवाज आपल्या लेकरांवर आलेले संकट टळल्यामुळे कमी झाला होता. निलगिरीच्या उंच झाडावरून एकटक ती आपल्या लाडल्यांना न्याहळत होती. त्यांना उचलून घेऊन जाण्यात ती असमर्थ होती. उंच टाकीवरून मात्र ओरडून आपल्या बाळांना आवाज देत त्यांचे सात्वन करत होती. जणू सांगत होती काळजी करू नका मी आहे तुमच्या पाठीशी. आजुनही एक बाळ शांत मरनासन्न अवस्थेत पडलेले होते. मला त्या पिल्लाची खुप काळजी वाटत होती. परंतु नाविलाज होता. परंतु खात्री होती की ते नक्कीच स्वतःला सावरेल. कारण उचलून घेताना त्याच्या पायांच्या नख्यांनी माझी हाताची बोटे घट्ट पकडली होती.
आम्ही खुप लांबुन कॅमेरा झुमकरून या बाळांची हालचाल टिपत होतो. आता झाडावरून आई त्यांच्या जवळच्या असलेल्या फांदीवर आली होती. आई जोरात ओरडत होती. अचानकच मरनासन्न अवस्थेत असलेल्या बाळात प्राण संचार झाल्याचे दिसून आले. त्याची हालचाल दिसून लागली व ते एकदम उभे राहिले. हे दृष्य पाहून मला अत्यानंद झाला. ते झोपलेल्या बाळाच्या कानावर पडलेल्या आईच्या आवाजाने संजीवनचे काम केले होते. अचानकच ते पळु लागले. आम्हा सर्वांच्या चेहर्‍यावर आनंद खुलला होता. तेवढ्यातच एका बाळाने अचानक टाकीवरून खाली जमीनीवर झेप घेतली. पंख हवेत विखुरली गेली व अलगत ते जमीनीवर उतरले. ही क्रिया पाहून
दुस-या पण बाळाने पंख उडवत जमीनीकडे झेपावले. आई त्या दिशेला उडताना दिसली. शेवटी दोन्ही बाळे आईच्या कुशीत सुखरूप पोहचली व आम्ही मोकळा श्वास घेत व आनंद व्यक्त करत व वर्षनाला दोन जीव वाचविल्याबद्दल शुभेच्छा देत पुढील कार्यासाठी मार्गस्थ झालो.
मित्रांनो कृपया पक्षी वाचवा व पक्षांशी मैत्री पुर्ण जगा. Please save birds
आमचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल subscribe करायला विसरू नका.)
लिंक
https://goo.gl/3usx1G

लेखक/छायाचित्रः श्री.खरमाळे रमेश (शिवनेरी भुषण)
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद) 
मो.नं. 8390008370 
उपाध्यक्ष -“शिवाजी ट्रेल”
संचालक – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका 
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

निसर्ग दर्शन जुन्नर तालुका.

निसर्ग दर्शन जुन्नर तालुका.
श्रावण आपले जादुई दर्शन देऊ लागला की निसर्ग हे गतवैभव पाहण्यासाठी व ते टिकविण्यासाठी विविध संरक्षकांची रक्षण करण्यासाठी नेमणूक करत असतो.
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – जुन्नर
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पे

 

पक्षी – तांबट

पक्षी – तांबट 
आढळ – बेलसर (जुन्नर)
तांबट (शास्त्रीय नावः Megalaima haemacephala indica) हा महाराष्ट्रात जवळपास सर्वत्र आढळुण येणारा पक्षी आहे. याला इंग्रजीत कॉपरस्मिथ किंवा क्रिमसनब्रेस्टेड बार्बेट तर हिंदीत छोटा बसंत असे म्हणतात. हा तांबूस रंगाचा असून साधारणपणे चिमणीच्या आकाराचा असतो. अतिशय दाट झाडीत याचे वास्तव्य असल्याने सहजपणे दिसत नाही. परंतु उन्हाळ्याच्या दिवसात यांचे दिवसभर तांब्यावर घण घालताना जसा आवाज येतो तसा दिवसभर आवाज काढत रहातो. त्यामुळे याचे अस्तित्व लक्षात येते. याचे पुकपुक्या असे स्थानिक नावही काही ठिकाणी आढळते. रूबाबदार मिशा,काळा पिवळा रंग, पिवळ्या रंगाच्या भुवया व कपाळी भगवा टिळा असे सुंदर दिसणार रूप पहातच रहावस वाटत. मानवाची चाहूल लागताच उडून जातो. झाडाच्या कोरलेल्या ढोलीत वास्तव्य करताना आढळून येतो.
बेलसर गावातील एका तुतीच्या झाडाच्या फळाचा स्वाद चाखताना तो आढळुन आला. पाना फुलातून लपंडाव खेळत स्वसंरक्षण मानवापासून कसा करतो ती पाहण्याची येथे प्रचिती आली.

छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक :- निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

 

 

तीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट…

आढळून आलेले तीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट

14925223_1772736966314407_8974491108652781488_n

14925367_1772736936314410_811917115527139467_n

14955947_1772736872981083_4927686320952203980_n
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in

किल्ले शिवनेरीच्या कुशीत लपलेला राष्ट्रीय पक्षी…

किल्ले शिवनेरीच्या कुशीत लपलेला राष्ट्रीय पक्षी – मोर…

14962808_1772643699657067_6584564430768913624_n

14955802_1772643712990399_6867949385962974166_n

14907022_1772643756323728_7358239847143540683_n
छायाचित्र – श्री.खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in

घरटे विणण्याची धावपळ करणार्या सुगरण पक्षाचे टिपलेले धावते छायाचित्र…

आपल्या लाडक्या सखीला झुलत्या घरात आनंदाने राहता येईल व ती माझ्यावर खुश होऊन प्रेमाचा वर्षाव करेल या विचारात घरटे विणण्याची धावपळ करणार्या सुगरण पक्षाचे टिपलेले धावते छायाचित्र.

14925662_1773334512921319_6287717058981985616_n

छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in

अरे खोप्यामधी खोपा…

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

कवयित्री – संत बहिणाबाई चौधरी

14095733_1741179709470133_5800257537207818704_n

14089004_1741179736136797_1052182764736896151_n

14117766_1741179849470119_8279934122307668408_n

 

 

मी हजारो घरे बांधण्यात मग्न असलेले कामगार पाहीलेत परंतु आज एका जागेवर तीन तास घर कसे विणले जाते हे मात्र या सुगरण पक्षी इंजिनिअरच्या काबाडकष्टातुन पाहीले.
छायाचित्र : श्री खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in

हजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ

हजारो परदेशी पाहुण्यांना शिवजन्मभुमीची ओढ

श्रावण म्हटले की हर्ष उल्हास आणि आनंद आलाच. येथील ओल्याचिंब परीसरात दव स्वरूपात उधळण करणार्‍या त्या हलक्या सरी आपल्या शरीरावरील कपडे ओले कधी करून जातात हे सुद्धा मग लक्षात येत नाही. या ऋतुत दुचाकी प्रवास म्हटले की दुचाकीच्या टायरखालुन उडणारे गढूळपाण्याचे फवारे लांबुन पाहणार्‍याच्या आनंदात भर घालतात. आणि जर का तो रस्ता कच्च्या माळराणावरील वाट असेल तर त्या रस्त्यावर पसरलेल्या व पावसाने तयार झालेल्या राढ्यारोड्यातुन दुचाकी चालवताना आपल्या कपड्यांना कधी नैसर्गिक रंग लागुन जातो हे कळत सुध्दा नाही.
याच मौजमस्तीचा आनंद घेण्यासाठी व परदेशी पाहुण्याची भेट घेण्यासाठी जुन्नरहुन गणेशखिंड, मढ व खुबीफाट्यावरून खिरेश्वर परिसरात पोहचलो. हे परदेशी पाहुणे न चुकता ऑगस्ट महिन्यात भारताचा स्वातंत्र दिन साजरा करण्यासाठी जुन्नर तालुक्यात अगदी आनंदाने व उत्साहाने हजर राहतात. ते मुद्दामहुन पारतंत्र्यातील आमच्या स्वाधीन असलेला भारत व स्वातंत्र काळातील आजचा भारत भ्रमण करत करत व पाहत पाहत जुन्नरमध्ये मुक्कामासाठी पोहचतात. कारण त्यांना येथील व्यापारी(नाणेघाट) मार्गाचा अजुनही विसर पडलेला नाही. येथील सात किल्यांच्या पराक्रमाचा व त्यांनीच सुरूंग लावून उध्वस्त केलेल्या किल्यांचा तसेच श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भुमीचा भला कसा विसर पडेल. त्यांना येथील असलेल्या 350 पेक्षा जास्त लेण्यांच अद्याप न सुटलेल कोड ते आजही सोडवण्याठी तर येथे येत नसावेत ना? येथील एक मावळा त्यांच्या शंभरांच्या बरोबर का होता याचे संशोधन करण्यासाठी तर ते येथे येत नसावेत ना? नकळत त्यांना पाहून प्रश्न पडतो.
याच पाहुण्यांना आपण मराठीत “रोहीत” किंवा “अग्निपंख , हिंदीत ” राजहंस” तर इंग्रजीत “फ्लेमिंगो” म्हणतो. इंग्रज पहायला सध्या भारतात कुठे मिळतात? म्हणून ते कसे होते त्यांची अनुभूती हे पक्षी पाहताना होते. पांढर्‍या शुभ्र पंखांनी झाकलेले शरिर, परंतु त्याच पंखांच्या आतिल लाल मखमली गालीच्या सारखे दिसणारे लाल गलाबी, काळे व सफेद पंख. यांचे गुलाबी पंख सुर्याच्या सकाळच्या कोवळ्या किरणांची आठवण करून देतात. तर तो आकाशात झेपावताना त्यांचे पंख आग्निच्या ज्वालांप्रमाणे भासतात म्हणुन तर त्यांचा उल्लेख अग्निपंख म्हणुन करतात. त्याचे गुलाबी उंच पाय, सापासारखी सहज नागमोडी वळणारी लांब मान तर आकाशाला गवसणी घालते कि काय याची नकळत भिती वाटते, पिवळे छोटे परंतु आकर्षक व तेजोमय डोळे तर सुर्यास्ताच्या सुंदर दृष्याचे दर्शन घडवतात. तर त्याची टोकाला दुरून काळी व गुलाबी चोच बळीराज्याच्या शेतातील लाकडी नांगराच्या औजारासारखीच दिसते.
अतिशय सुंदर पाण पक्षी म्हणून याची गणना तर आहेच व तो कितीतरी वेळ खाली वाकून पाण्यातील भक्ष पकडण्यात तल्लीन झालेला दिसतो. त्याची ती संथ चाल व एका पायावर उभे राहून करत असलेली तपस्या पाहून खुप आनंद वाटतो. अशा या परदेशी पाहुन्यांना आपल्या मायभुमीची आठवण ऑक्टोबर महिन्यात होते. हजारोंचा त्यांचा उडणारा थवा जेव्हा मायदेशाकडे उंच भरारी घेताना झेपावतो तेंव्हा गगनाचाही हे दृश्य पाहून आनंद गगनात मावेनासा होतो.
असा हा रोहित म्हणजे कुटुंबाची काळजी घेणारा व प्रगती करणारा अश्या विविध रूपांनी स्वतःच सौंदर्य खुलवणारा आणि पर्यटकांना आकर्षित करणार्या पक्षाच दर्शन घ्यायचे झालेच तर अगदी आनंदाने जुन्नर तालुक्यातील खिरेश्वर येथील परीसराला भेट द्यायला विसरू नका. परंतु एक गोष्ट सांगाविशी वाटते की या पाहुन्यांना आपला उपद्रवी उपक्रम चुकूनही दाखवू नये ही सदिच्छा.
लेखक /चित्रांकन – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका
8390008370

14141771_1739283129659791_6535942532582450694_n 14045529_1739283596326411_4901147038920609747_n 14045996_1739283726326398_6830727754416622679_n 14054218_1739283089659795_6969707593774971972_n 14067597_1739283196326451_429445480253483652_n

ऐतिहासिक घाट

ऐतिहासिक घाट
जुन्नर शहराच्या उत्तरेला कुकडीमाईच्या दक्षिण किणार्यावर 450 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला एक ऐतिहासिक घाट आज अंतिम घटिका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.
या घाटाला चार टप्पे करून बांधण्यात आले आहे. साधारण 70 ते 80 फुट लांबीचा व 35 ते 40 फुट रूंदीच्या या घाटाला चार बुरूज व दोन देवळ्या बनवुन उभारण्यात आले आहे. संपूर्ण घाट हा घडीव दगडी तोडीत व चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील पहिल्या बुरूजाखालील पायर्‍यांचा भाग पश्चिमेकडेच खचल्याने तो साधारण दोन फुट खचला आहे. व सामनी दोन असलेल्या बुरूजांच्या मध्यभागी साधारण दोन फुट चिर पडल्याने येथे भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील नागरिक या घाटाशी आपले किती जीवाभावाचे नाते आहे ते सांगताना व आज घाटाची झालेली दुरावस्था वर्णन करताना दु:ख व्यक्त करतात.
येथे जुन्नर शहरातील अनेक तरूण छंद आणि व्यायाम म्हणून पोहण्यासाठी येत असतात. कारण शहरातील बांधण्यात आलेला स्विमिंग पूल गेली अनेक महिने बंद अवस्थेत असल्याचे येथील तरूण सांगतात त्यामुळे येथेच नाविलाजास्तव आपला छंद जोपासावा लागतो असे म्हणतात.
कुकडीमाईचा वाहण्याचा झुकता कल या घाटाच्या दिशेला असल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहत येणार्या नदीच्या पाण्यामुळे या घाटाच्या पात्रतील पायर्‍यांखालून पाण्याने त्या खालील माती पाण्याबरोबर वाहुन गेल्याने कपार निर्माण झाली आहे व या कपारीत अडकून येथे पोहण्यासाठी येणाऱ्या तरूणांना धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरीब माता भगिनी येथील पात्रात कपडे धुन्यासाठी येथे येत असतात त्यांनाही येथे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घाटाची जपवणूक व ऐतिहासिक वारसा टिकवला जावा म्हणून संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळीच जर पाऊल उचलले गेले व संवर्धन केले गेले तर भविष्यात घडणार्‍या अपघाताच्या घटना घडणार नाहीत.
येथील सभोवतालचा परीसर अतिशय नयनरम्य असून नेत्रसुख देणारा आहे. माझ्या निरीक्षण दरम्यान मला भारतात आढळुन येणार्या विविध खंड्या पक्ष्यांपैकी (kingfisher bird) तीन जाती याच घाटाच्या पश्चिम नदिपात्रात उडताना पाहुन अत्यंत आनंद झाला होता. येथे विविध प्रकारचे पक्षी नेहमीच संचार करत असतात. या घाटाचे मनमोहक दृश्य मार्च महिन्यात व जुन्नर शहरातून लेण्याद्रीला जाण्यासाठी जो मध्यमार्गावर नदी पुलाने जोडला आहे त्यावरून खुप छान दिसते. अशा या ऐतिहासिक वास्तूची जपवणूक व येथे अनुभवलेल्या क्षणांचा साक्षीदार असलेल्या या घाटाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्यास संवर्धित करण्यात आले तर मोठा अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

13226857_1704109149843856_1166344061351016688_n 13240658_1704109133177191_6574750045059792152_n 13265947_1704109116510526_4799872739217833346_n 13227178_1704109096510528_7095207743982333350_n 13232922_1704109056510532_1729831524050188108_n13254251_1704109029843868_8989976623710206011_n 13265945_1704109003177204_5950796829783521440_n 13165938_1704108959843875_4948221906555886630_n