Category Archives: घाट

दार्याघाट

दार्याघाट

जुन्नरकरांसाठी दार्याघाट हा शब्द काही नवखा नाही. प्रत्येक पंचवार्षिक निवडणूकांमध्ये येणार्या या शब्दाचा पुनर्जन्म हमखास होताना दिसतोच. कारण मुंबई हाकेच्या अंतरावर आणायची असेल तर हा मार्ग होणे खुप गरजेचे आहे अशी अनेक पोकळ अश्वासने देण्यासाठी हा दार्याघाटाचा शब्दप्रयोग केला जातो. निधी उपलब्ध नसला तरी येथे उद्घाटनाचा नारळ फोडला जातो. असो. सांगण्याचा अर्थ असा आहे की एवढा निसर्ग संपन्न असलेला हा सह्याद्रीने वेढलेला भू भाग आहे. याचे सौंदर्य खुलते ते पावसाळ्यात. येथील सात धबधब्याची शृंखला पाहुन तर प्रत्येक पर्यटक अवाकच होतो. येथील निसर्ग संपदा अभ्यासू व्यक्तीला अक्षरशः वेडच लावते. एवढा अफाट वनस्पतींचा साठा या परिसराने राखण्यात यश मिळवलेले आहे.
आता आपण दार्याघाट या शब्दाचा अर्थ काय होतो ते पाहूया. जो भुभाग खोल अशा दरीने वेढलेला असतो परंतु त्या दरीतून मनुष्याला येण्यासाठी मार्ग असतो त्या मार्गालाच आपण घाट म्हणतो. म्हणजेच दोन उंच कड्यांच्या किंवा डोंगराच्या मधुन जाण्याची वाट म्हणजेच घाट होय. परंतु येथुन ही वाट दरीतून वर येत असल्याने या ठिकाणाचे नाव दार्याघाट असे संबोधण्यात येत आहे.
बाहेरील राज्यातील अनेक पर्यटक पावसाळ्यात या भागाकडे आज आकर्षित होत असून या परिसरातील आदिवासी बांधवांना एक रोजगार उपलब्ध होताना पाहून अत्यंत आनंद होत आहे. आपणही येथील बांधवांच्या रोजगारात वाढ व्हावी या उद्देशाने आलात तर येथील निसर्ग यात्रा खुप आनंद दिल्या शिवाय राहत नाही. मग येताय ना? पावसात येथील धबधब्यांखाली ओलेचिंब होण्यासाठी.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका 
13321642_1707867399468031_3704385629996370467_n 13307335_1707867379468033_5056900874050017547_n 13344709_1707867342801370_6018945017177285683_n 13310519_1707867326134705_5584212194000278175_n 13343110_1707867289468042_8212705309321705035_n DSC01001

ऐतिहासिक घाट

ऐतिहासिक घाट
जुन्नर शहराच्या उत्तरेला कुकडीमाईच्या दक्षिण किणार्यावर 450 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला एक ऐतिहासिक घाट आज अंतिम घटिका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.
या घाटाला चार टप्पे करून बांधण्यात आले आहे. साधारण 70 ते 80 फुट लांबीचा व 35 ते 40 फुट रूंदीच्या या घाटाला चार बुरूज व दोन देवळ्या बनवुन उभारण्यात आले आहे. संपूर्ण घाट हा घडीव दगडी तोडीत व चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील पहिल्या बुरूजाखालील पायर्‍यांचा भाग पश्चिमेकडेच खचल्याने तो साधारण दोन फुट खचला आहे. व सामनी दोन असलेल्या बुरूजांच्या मध्यभागी साधारण दोन फुट चिर पडल्याने येथे भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील नागरिक या घाटाशी आपले किती जीवाभावाचे नाते आहे ते सांगताना व आज घाटाची झालेली दुरावस्था वर्णन करताना दु:ख व्यक्त करतात.
येथे जुन्नर शहरातील अनेक तरूण छंद आणि व्यायाम म्हणून पोहण्यासाठी येत असतात. कारण शहरातील बांधण्यात आलेला स्विमिंग पूल गेली अनेक महिने बंद अवस्थेत असल्याचे येथील तरूण सांगतात त्यामुळे येथेच नाविलाजास्तव आपला छंद जोपासावा लागतो असे म्हणतात.
कुकडीमाईचा वाहण्याचा झुकता कल या घाटाच्या दिशेला असल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहत येणार्या नदीच्या पाण्यामुळे या घाटाच्या पात्रतील पायर्‍यांखालून पाण्याने त्या खालील माती पाण्याबरोबर वाहुन गेल्याने कपार निर्माण झाली आहे व या कपारीत अडकून येथे पोहण्यासाठी येणाऱ्या तरूणांना धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरीब माता भगिनी येथील पात्रात कपडे धुन्यासाठी येथे येत असतात त्यांनाही येथे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घाटाची जपवणूक व ऐतिहासिक वारसा टिकवला जावा म्हणून संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळीच जर पाऊल उचलले गेले व संवर्धन केले गेले तर भविष्यात घडणार्‍या अपघाताच्या घटना घडणार नाहीत.
येथील सभोवतालचा परीसर अतिशय नयनरम्य असून नेत्रसुख देणारा आहे. माझ्या निरीक्षण दरम्यान मला भारतात आढळुन येणार्या विविध खंड्या पक्ष्यांपैकी (kingfisher bird) तीन जाती याच घाटाच्या पश्चिम नदिपात्रात उडताना पाहुन अत्यंत आनंद झाला होता. येथे विविध प्रकारचे पक्षी नेहमीच संचार करत असतात. या घाटाचे मनमोहक दृश्य मार्च महिन्यात व जुन्नर शहरातून लेण्याद्रीला जाण्यासाठी जो मध्यमार्गावर नदी पुलाने जोडला आहे त्यावरून खुप छान दिसते. अशा या ऐतिहासिक वास्तूची जपवणूक व येथे अनुभवलेल्या क्षणांचा साक्षीदार असलेल्या या घाटाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्यास संवर्धित करण्यात आले तर मोठा अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

13226857_1704109149843856_1166344061351016688_n 13240658_1704109133177191_6574750045059792152_n 13265947_1704109116510526_4799872739217833346_n 13227178_1704109096510528_7095207743982333350_n 13232922_1704109056510532_1729831524050188108_n13254251_1704109029843868_8989976623710206011_n 13265945_1704109003177204_5950796829783521440_n 13165938_1704108959843875_4948221906555886630_n

गिर्यारोहकांनी घेतला नाणेघाटात रॅपलिंगचा थरार

गिर्यारोहकांनी घेतला नाणेघाटात रॅपलिंगचा थरार

जुन्नर तालुक्याला लाभलेल्या निसर्ग संपन्न वैभवाचे दर्शन संपुर्ण दुनियेन घ्यावे, पहावे व त्यांना समजावे
म्हणुन दि. 3 एप्रिल 2016 ला प्रसिद्ध पुरातन व्यापारी मार्ग आणि मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणारा असा हा नाणेघाट कि ज्याला ऐतिहासिक वारसा तर लाभला आहेच, परंतु भौगोलिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या भुकंपातील दोन डोंगराच्या मध्ये बनलेले खडकाचे उभे खाप (स्टॅडिंग डाईक ) विविध वाहणारे धबधबे, रिव्हर्स धबधबे आणि 15 कि.मी अडीच ते तीन हजार फुट खोल असणारे कोकण कडे की ज्या सह्याद्री रांगेने खुप सार्या जैवविविधता आपल्या उदरी आजही जशीच्या तशी जोपासलेली आहे अशा विविधतेने नटलेल्या निसर्ग रम्य वातावरणाची पर्यटकांना, गिर्यारोहकांना भुरळ पडावी म्हणून ” “निसर्ग रम्य जुन्नर तालुका ” या पेजच्या माध्यमातून आयोजित व सह्याद्री आऊटडोर आणि अॅडव्हेंचर पुणे यांच्या संपूर्ण मार्गदर्शनाखाली रॅपलिंग इव्हेंट घेण्यात आली. या इव्हेंट साठी महाराष्ट्रातुन नाशिक, मुंबई, ठाणे, अहमदनगर, पुणे अशा 44 गिर्यारोहकांनी भरभरून प्रतिसाद देऊन आनंद घेतला. विशेष म्हणजे या थरारामध्ये एकुण 8 धाडसी महीलांनी आपला सहभाग नोंदविला तर आई- मुलगा, वडील – मुलगा, वडील – मुलगी, भाऊ- बहीण,
पती – पत्नी तसेच टिव्ही चायनल रिपोर्टर व पत्रकार बंधू असा एकत्र 320 फुट रॅपलिंग करण्याचा क्षण पाहण्यासाठी मिळाला. यामध्ये 2 गिर्यारोहक सोडले तर उर्वरित सर्व गिर्यारोहक हे प्रथमतःच अनुभव घेतानाचे वर्णन ते स्वतः करतानाचे दृश्य पाहायला मिळाले व त्यांच्याकडून अत्यानंद झालेला ऐकायला मिळाला
ही इव्हेंट फक्त हाईट फोबीया नावाच्या आजारावर उपचार व माहीतीस्तव आयोजित करण्यात आली होती. व आपण भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल आपले “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” मार्फत खुप खुप अभिनंदन. मित्रांनो आपल्या या माध्यमातून अनेक गिर्यारोहक जुन्नर तालुक्याकडे निश्चितच आकर्षिले जातील असा एक विश्वास वाटतो. ज्या ज्या गिर्यारोहकांना या इव्हेंटला काही कारणास्तव येता आले नाही त्यांनाही पुन्हा येणारच म्हणुन इच्छा व्यक्त केल्याच्या भावना मेसेजद्वारे व्यक्त केल्या, अशा या मित्रांचेही आभार व्यक्त करतो व आपल्या इच्छा पुर्ण करण्याचा मानस व्यक्त करून सदिच्छा व्यक्त करतो.
छायाचित्र : श्री. खरमाळे रमेश

(माजी सैनिक खोडद)

9165_1687226374865467_1949343262905266935_n
12932628_1687226338198804_2748559009384108398_n 12472325_1687226298198808_6565491443066806244_n 12512412_1687226184865486_7279329307721872294_n 12931112_1687226171532154_3331678085884940938_n 10660291_1687226151532156_2288924904518209975_n12963916_1687226254865479_5171829543437173715_n

मेघराजा आला नाणेघाटचा पहारेकरी किल्ले जिवधनच्या भेटी…

मेघराजा आला नाणेघाटचा पहारेकरी किल्ले जिवधनच्या भेटी. त्यांच्या भेटीचे टिपलेले मनमोहक दृश्य.

12805659_1676687802585991_8779683552876204550_n 12804627_1676687772585994_2297125411393035154_n 10406797_1676687762585995_2318928771145863564_n

 

छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका

सातवाहन कालीन नाणेघाट.

6187_1679411482313623_6965066576162059529_n

तळपत्या उन्हात पर्यटकांना साद घालणारा ऐतिहासिक सातवाहन कालीन नाणेघाट. प्रखर सुर्य किरणांनी जणू नाणेघाटाच्या शरीराला मेकअप करून त्याचे लावण्य तेजोमय केल्याचा भास होतो. नाही का?
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद)