Category Archives: ईतर

खिरेश्वरच्या जुन्नर दरवाजा मार्गे हरिश्चंद्रगड दर्शनासाठी जाताना काय पहाल.

जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.

जुन्नर तालुक्यातील हे भुयार कोठे पहायला मिळते सांगा पाहू.

मी याबाबतीत संपूर्ण माहिती देणार आहेच परंतु
जो कुणी प्रथम हे भुयार ओळखेल त्या पर्यटकाचा फेसबुक प्रोफाईल फोटो पेजवर अभिनंदन म्हणुन टाकण्यात येईल.
कमेंट्स मध्ये या भुयाराचे करेक्ट लोकेशन लेणी किंवा किल्यावर कोठे आहे ते सांगणे गरजेचे आहे. तसेच पोस्ट शेर करणे आवश्यक आहे.
छायाचित्रे :- श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

भेकर प्राणी

भेकर प्राणी

भेकर हरीणांच्या सारंग कुळातील हरीण आहे. याचे वैशिठ्य म्हणजे इतर सारंग कुळातील हरणांसारखे याला शिंगे नसतात. परंतु शरीरातील इतर वैशिठ्ये ही सारंग कुळातील हरीण असल्याची साक्ष देतात. याचे नाव भेकर हे त्याच्या आवाजावरुन पडले आहे. याला भुंकणारे हरीण असेही म्हणतात. जंगलातील शांततेत याच्या भुंकण्याचा आवाज चांगलाच घुमतो व दुरवर ऐकू येतो.

जुन्नर तालुक्यातील माझी वाईल्ड लाईफ फोटोग्राफी.
कृपया विनंती आहे ठिकाण विचारू नये.
छायाचित्रे : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
“शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

शिवशाहीचा जन्म झालेले व निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळ असलेले ठिकाण.

शिवशाहीचा जन्म झालेले व निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळ असलेले ठिकाण.

कल्याण पासून पुर्वेस १२०  कि.मी अंतरावर, अहमदनगरच्या पश्चिमेला १०० कि.मी अंतरावर, नाशिक हुन दक्षिणेस १२० कि.मी अंतरावर व पुण्याच्या उत्तरेला ९० कि.मी अंतरावर असलेल्या जुन्नर तालुक्यातील सह्याद्रीच्या निसर्ग सौंदर्याची मुक्तहस्ते उधळण असलेल्या बालाघाट रांगेत शिवशाहीने जन्म घेतला. शिवशाहीचे धुरंदर याच एका रांगेतील वसलेल्या किल्ले शिवनेरीवर जन्माला आले आणि ते म्हणजे राजे शिवछत्रपती शिवराय. त्यांनी फक्त आणि फक्त मनुष्य धर्म जोपासत हिंदुस्थानातील रयतेला आपलस करत स्वराज्य निर्माण केले. अशा या शिवपावण स्पर्श भुमीच्या, जुन्नर तालुक्याची अलौकिक निसर्ग सौंदर्याची मी काही उधळण आपल्या पर्यंत छायाचित्रांच्या माध्यमातून पोहचवतोय. आवडली तर नक्कीच शेर करा.
आमचे इतर नाविन्यपुर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी युट्यूब चायनल खालील लिंक वर क्लिक करून सब्स्क्राईब करायला विसरू नका व हा अविष्कार इतर आपल्या मित्रमंडळीना पाहण्यासाठी शेर करायला विसरू नका.
https://www.youtube.com/c/NisargramyaJunnarTaluka…
छायाचित्रे व चित्रांकन: श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
 “शिवाजी ट्रेल”
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

अंबा अंबिका लेणी ( खोरे वस्ती )

अंबा अंबिका लेणी ( खोरे वस्ती )
जुन्नर शहराच्या जवळच 1.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे 1 कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात.साधारणतः येथे 50 कोरीव लेण्या पहावयास मिळतात. विशेष म्हणजे या लेणी जैनतिर्थनकार यांच्या कालखंडातील असुन तीनही लेणी समुह सुंदर अशा कोरीव कलाकृतीत पहावयास मिळतात.
मौर्यानंतर इ.स.पुर्व.184 नंतर ते इ.स 250 पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात.
जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात 30 सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही , पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.
सातवाहन काळ अन्न, वस्र, निवारा, धार्मिक संकल्पना, साहित्य, देश-विदेश व्यापार व लोकजीवनाच्या दृष्टीने खुपच महत्वपूर्ण आहे.
येथील खास भुतलेणी (खोरेवस्ती) वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत.
सर्व प्रथम दक्षिणेकडील लेणी समुह पाहुन नंतर जुन्नर शहराच्या दिशेला गेलेल्या पाऊलवाटेने चालत राहिले की याच पाऊल वाटेने दोन्ही समुह पहावयास मिळतात. या लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.परंतु या लेण्या पाहताना शांतता बाळगणे महत्वाचे आहे. कारण येथील लेण्यामध्ये असलेल्या मधमाश्या कॅमेराच्या फ्लॅश व आपल्या आवाजाने उठतात व चावतात. पश्चिमेस उभ्या असलेल्या किल्ले शिवनेरीचे शिवलिंग रूपातील दर्शन मनमोहीत करते. लेण्याद्री गणपती गिरीजात्मजाचे उत्तरेकडे तर हाबसी गोल घुमटाचे पुर्वेकडील दृश्य आपणास आकर्षित केल्या शिवाय राहत नाही.
लेखक / छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वन विभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर?

नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर? 
वाचा
व्यापाराची राजधानी म्हणून जुन्नर तालुक्याची ओळख पुर्वी होती. ऐतिहासिक वास्तूंच्या बाबतीत म्हटले तर जगातील एकमेव तालुक्याची ओळख आहे ती येथील असलेल्या 350 च्या वर लेण्यांमुळेच. ज्या राजाने प्रशासन व जनहिताच्या बाबतीत, संक्षणार्थ किंवा आदर्श कसा असावा याची महती संपूर्ण विश्वात निर्माण केली अशा राजाचे म्हणजे छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान म्हणजेच जुन्नर तालुका. जगात एकमेव प्राणी वेद बोलला त्या प्राणी रेड्याची समाधी असलेला तालुका म्हणजे जुन्नर तालुका. संत महंत ज्यांना जगद्गुरू म्हटले जाते अशा संत तुकाराम यांना रामकृष्ण हरी मंत्र देणारे त्यांचे गुरू चैतन्य प्रभू यांची समाधी असलेला तालुका अर्थात जुन्नर तालुका होय. आणि माझ्या मायबोली मराठी भाषेचा जन्म किंवा जीला अमिजात भाषेचा मान मिळवून देणारे पुरावे असतील ते पुरावेही मिळणारे ठिकाण असेल तेही जुन्नर तालुक्यातच. अशा कितीतरी गोष्टी जुन्नर तालुक्यात पहावयास व अभ्यासावयास मिळतात.
निसर्ग सौंदर्याची उधळण या तालुक्यातच का? असा प्रश्न उपस्थित झाला असेलच. सह्याद्रीच्या सात रांगामध्ये वसलेला हा तालुका व याच तालुक्यात सर्वाधिक असलेले सात किल्ले व तेही येथेच का निर्माण केले गेले असावेत बर? या व्यतिरिक्त तालुक्यात तीन भुईकोट किल्ले, जलव्यवस्थापणाचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे मलिकांबर पाणी पुरवठा योजना, दोन अष्टविनायक मंदिरे तर तीन हेमाडपंती मंदिरे, कुंभमेळा, वैज्ञानिक क्षेत्रातील जागतीक महादुर्बिण, प्राणी क्षेत्रातील साखळीतील एक नंबरचा प्राणी म्हणजे बिबटे जो निसर्ग परिपूर्ण असल्याची ओळख निर्माण करून देत आहे.औषधी वनस्पतींनी परिपूर्णता. अशा अनेक गोष्टींचा विचार केला गेला म्हणून मी नैसर्गिक सौंदर्यात जुन्नर तालुका अग्रेसर का असावा बर याचे संशोधन करूनच हे टायटल दिले आहे. पावसाळ्यात येथील धबधबे तर येथील सौंदर्यास अधिकच भर घालतात व पर्यटक या ठिकाणांकडे सहाजिकच आकर्षिले जातात.
मित्रांनो हे सौंदर्य आपणासच जोपासायला हवे. मनुष्याला हे पहायला खुप आवडते परंतु जोपासायला अजिबात आवडत नाही म्हणून अशा ठिकाणांना आपला आदर्श मानून येथील पर्रावरणाचा कोणत्याही प्रकारचा -हास न होता हे वर्षेन वर्ष टिकून राहण्यासाठी फक्त येथील पाउलवाटांचाच वापर करा.
आपल्याला असलेल्या व्यसनांना करण्यासाठी खुप काही हाॅटेल्स आहेत ते तेथे बसून आपण करू शकता. परंतु या निसर्ग देवतेला अधिक फुलविण्यासाठी व तीचे सौंदर्य जपण्यासाठी आपण स्वतःहूनच पुढे यायला हवे.
जुन्नर तालुक्यातील आंबोली (दार्याघाट) चे हे निसर्ग सौंदर्य वैभव आहे. आपण येथे मनसोक्त आनंद लुटा परंतु येथील पर्रावरणाचा आनंद घेत असताना कोणत्याही स्वरूपाचा -हास होणार नाही याची पण जिम्मेदारी आपण स्वतः घ्या. काचेच्या बाटल्या फोडू नका, प्लास्टिक, पाण्याच्या बाटल्या पुन्हा सोबत घेऊन जावे ही सदिच्छा.
छायाचित्र/ लेखक – श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल.
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका.
संस्थापक – “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज, मोबाईल अँड्रॉइड अप व युट्यूब चाईनल.
मो. नं 8390008370

 

आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव (जुन्नर)

आमंत्रण कृषी पर्यटन केंद्र गोळेगाव(जुन्नर)
ज्या मातीशी नाळ जोडली जाते व या मातीशी भक्कम नात निर्माण केले जाते त्याचे आज तरी उत्तम उदाहरण म्हणजे कृषी पर्यटन केंद्र होय. याच माध्यमातून ग्रामीण संस्कृतीचा व खाद्य संस्कृतीचा पौराणिक वारसा जपला जातोय. खेड्या कडे चला हे वाक्य का म्हटले गेले तर येथे प्रत्यक्ष आल्यावरच अनुभव येतो. या आमंत्रण कृषी पर्यटन केंद्रास अनेक मोठमोठ्या हस्तींनी भेट दिलीय व या कृषी पर्यटन केंद्राशी जवळच नाते निर्माण करण्यात श्री. शशिकांत जाधव यशस्वी झालेत. आणि त्यामुळेच येथे येणाऱ्या पर्यटकांना हे हक्काच घर वाटू लागलय.
विविध औषधीक वनस्पती, व येथील विषा पासून दुर असलेले शेती पिक व त्याचे महत्व श्री. शशिकांत भाऊ अगदी तळमळीने पर्यटकांना समजून सांगतात. म्हणूनच त्यांनी पुरातन बी- बीयांची साठवणूक करण्यास सुरूवात केली आहे. व तो जुना गोडवा व त्याची चव पुन्हा पुन्हा चाखण्यास पर्यटक येथे येत असतात. प्रत्येक पर्यटकांचे स्वागत ते जुन्या सनई वाद्य सुरात करायला विसरत नाही. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकांना ते हिरवा चाफा फुल देऊन मोहीत करतात.म्हणूनच त्यांना अदरातिथ्य या पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. त्यांचे गोड शब्द ऐकायला पर्यटक अतुरलेले असतात. गावठी गोमाता तीचे फायदे व तीची जोपासना अगदी प्रेमाने ते करतात. हजारो पर्यटक त्यांनी फुलवलेली औषधी वनस्पती बाग पाहण्यास येथे येऊन माहीती घेऊन समाधानी होतात.
शहरातून आलेल्या पर्यटकांना शेती कशी केली जाते, जात्यावर दळण कसे दळले जाते, चुल्हीवर बाजरीची भाकरी कशी करतात, मोट म्हणजे काय अशा कितीतरी विविधतेचे प्रत्यक्षीक देऊन ते त्या पर्यटकांकडून स्वतः करून घेतात. त्यांनी जपलेल्या व लावलेल्या वनराई विविध पक्षांनी वास्तव्य निर्माण केले असून त्यांना काय हवय हे भाऊ तुरंत हेरतात. मधुमख्खींनी पण या कृषी पर्यटन केंद्रातच आपल्या राहुट्या लावलेल्या दिसतात.
अशा विविधतेने परिपूर्ण असलेल्या पर्यटन केंद्रात आपल्याला राहण्याची व जेवणाची सोय असून आपण येथे सर्व माहिती घेण्याचा आनंद लुटण्यास इच्छुक असालच यात शंकाच नाही.
संपर्क:- श्री. शशिकांत जाधव मो. नं.9970056412
कु. आनंद जाधव मो. नं.7040712015
Website :- www.aamantranagritourism.com

श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनविभाग – जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
संस्थापक – निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज,युट्यूब चायनल व मोबाईल अँड्रॉइड अॅप
मो. नं. 8390008370

 

 

 

अतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका

अतिरम्य मनोरंजक धबधब्यांचा जुन्नर तालुका 

चातकासारखी वाट बघत बसतो ती आपण पावसाळ्याची. मग तो बळीराजा असो अथवा पर्यटक.कुणाला नको असते ती हिरवाईचा शालू नेसलेली सजिवसृष्टी. ओल्याचिंब पावसात भिजताना नकळतच शाळेतील जुन्या आठवणी जाग्या होतात.
मग वेध लागतात ते पावसाळी पिकनिकचे.श्रावणातील रिमझिम बरसलेल्या पावसामुळे शहरातील नोकरी कामात दमछाक झालेला पर्यटक मान्सून पिकनिकची तयारी करू लागतो. छान छान उंच फुटांच्या डोंगरावरून फेसाळत येणारे पाणी पाहून तो आनंदून जातो. ते पाणी अंगावर घेण्याची मजा काही औरच असते. जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट, खिरेश्वर, खुबीफाटा,लेण्याद्री, नाणेघाट, आंबोली यांसारख्या गजबजलेल्या ठिकाणांबरोबरचं तो जवळपासचे धबधबे शोधण्याची जोरदार धावपळ सुरू करतो ते निसर्गाच्या सानिध्यात सुख व आनंद शोधण्यासाठी आणि ते पण कुटूंबातील सदस्यांना बरोबर घेऊनच. मग लागा तयारीला निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज आपणास या ठिकाणी अगदी माहीती व फोटोसहित घेऊन जाणार आहे. मग येताय ना?

आंबोली
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले हे ठिकाण. तिन्ही बाजुने सह्याद्रीने वेढलेले.अनेक धबधब्यांची विविध रूपे पहायला मिळतात. जुन्नर शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. जुन्नर व आपटाळे येथे हॉटेल्स आहेत.आंबोली मधील गावकऱ्यांना सांगितल्यास ते जेवणाची सोय ते राणभाज्यांच्या स्वादातुन करतात.

नाणेघाट
या ठिकाणास कोण ओळखत नाही. मुंबईकरांचे तर हे महाबळेश्वरच. येथील परिसर नेहमीच धुक्यासोबत लपाछपी खेळत असतो. येथील रिव्हर्स ऑटरफाॅल पहाताना स्वर्ग पृथ्वीवरच अवतरला की काय असा भास होतो. काही मुंबईकर माळशेज मार्गाने येथे येतात तर निसर्ग वेडे माळशेज घाट चढण्याआधी नाणेघाट फाट्यावरून निसर्ग यात्रा करत येथे पोहचतात. नाणेघाट परिसरात हाॅटेल्स सुविधा उपलब्ध असून आपणस तेथे जेवण व राहण्याची सुविधा उपलब्ध आहे.

माळशेज घाट 
येथे काळू नदी आणि धबधबा अशा दोन्ही ठिकाणचा आनंद घेता येतो. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर काळू ऑटर फाॅल आहे. परंतु धबधब्यांच्या रांगाच रांगा पहावयाच्या झाल्या तर आपणास घाटमार्ग चढावा लागतो.पर्यटकांसाठी घाटात कोणतीही जेवणाची व्यवस्था नाही. घाट चढून आल्यावर एम. टी.डी.सी तसेच पुढे अनेक विविध व्हाॅटेल्स सुविधा उपलब्ध आहेत.

सोनावळे धबधबे
सह्याद्रीच्या पर्वतरांगात अतिशय वेगात वाहत येणारे पाणी या ठिकाणी दोन भागात दुभागलेले दिसते. व ते उंचावरून खाली कोसळताना पाहून तर डोळ्यांचे पारणे फिटले. या ठिकाणी जाण्यासाठी गाडी हा एकमेव पर्याय आहे. आपटाळे पासून दक्षिण डोंगरांगेत सोनावळे गावातील हा धबधबा आहे. या ठिकाणी जेवणासाठी हॉटेल्सची सोय नसली तरी आपटाळे येथे जेवणाची व्यवस्था होते.

हिवरे मिन्हेर घाट धबधबा
राळेगण गावातून हिवरे मिन्हेर या घाटाने वर जाताना डाव्या बाजूला या हिरव्या गार वनराईने व्याप्त भागात या धबधब्याचे रमनिय दृश्य पहावयास मिळते. सोनावळे, राळेगण एकच सलग्न डोंगर रांग असून तेथेही आपण स्वतःच गाडीने जावे लागते.

देवळे धबधबा
धबधब्यांची विविध रूपे, येथील क्षणाक्षणाला बदलणारे वातावरण, धुक्यात लपलेली वनराई असा त्रिवेणी संगम पहायचा असेल व अनुभवयाचा असेल तर आपल्या शक्तीचे प्रदर्शन करूनच येथे पायपीट करून पोहचावे लागते. स्वतःची गाडी व जेवणाची सोय स्वतःलाच करावी लागते.
या व्यतिरिक्त अनेक धबधब्यांचा भरपूर आनंद आपणास येथे अनुभवता येतो. मग येताय ना? निसर्ग रम्य जुन्नर तालुक्यात निसर्ग देवतेचे फेसाळलेले नवरूप पहायला.

लेखक/ छायाचित्र श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
वनरक्षक – जुन्नर
उपाध्यक्ष- शिवाजी ट्रेल
मो.नं 8390008370

 

 

 

 

माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा

माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा.

जुन्नर शहराच्या पश्चिमेला सात कि.मी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माणिकडोह होय. येथे जाण्यासाठी वापरात येत असे ती पुरातन व्यापाराची व नाणेघाटला जाणारी वाट. परंतु काळ बदलत गेला व या पाऊल खुणा व या वाटेचा इतिहास बुडला गेला तो माणिकडोह धरणाखाली. श्री. शिवछत्रपतींच्या दुसर्‍या सुरतेच्या लुटीतील लुटलेले मानिकरत्न ज्या डोहात बुडावले गेले ते येथील कुकडी नदीच्या डोहात. कुकडी माईच्या पात्रखडकात पाण्याने जवळपास  सांदन व्हॅली सारखी ५००  मीटर लांब घळ नैसर्गिक रित्या तयार झालेली असून जवळपास ती ४० ते ५० फुट खोल असून तिच्या तोंडावर बांधलेला यशवंत घाट व गावातील विविध दगडी शिल्प आपणास पुरातन इतिहासात डोकावण्यास भाग पाडतात.
गावाच्या दक्षिणेस जवळच अर्ध्या कि.मी अंतरावर पुर्व, पश्चिम डोंगररांग पसरलेली असून ही रांग पुर्वेकडे तुळजाभवानी लेणी समुहापाशी संपते. परंतु पश्चिमेस गेलेल्या रांगेतील लेणींचादरा म्हणुन नाव असलेल्या ठिकाणी ही लेणी पहावयास मिळते. ज्या ठिकाणी सध्या खडी क्रेशर जे माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या रेषेत दक्षिणेस दिसून येते त्याच ठिकाणी डोंगराच्या मधभागी वाटीच्या आकारातील कातळात या लेणी कोरलेली दिसून येतात. ही लेणी कोरण्या आधी येथे प्रथमतः पाण्याची दोन टाकी खोदण्यात आल्याचे लक्षात येते. येथील डोंगररांगावर त्याकाळी येथे सहज कंदमुळे उपलब्ध होत असे परंतु पाण्यासाठी मात्र माणिकडोह गावाकडे धाव घ्यावी लागत असेल कारण मानवाच्या दोन मुख्य गरजा म्हणजे अन्न आणि पाणी होय. त्यामुळेच प्रथम येथे टाकी कोरली गेली असावित.
येथील कातळाचा अभ्यास करता या लेणी कोरताना कच्च्या स्वरूपात आढळुन आला व त्या त्या ठिकाणी काम अर्धवट सोडलेल्या खुणा आढळतात.
या लेणीमधून समोरील दृश्य मनाला भुरळ घालणारे असून, माणिकडोह धरण, किल्ले हडसर, हटकेश्वर डोंगररांग व यामधील येणारा सपाट भुभाग न्याहाळता येतो. त्यामुळे येथे लेणी कोरण्या पाठीमागचा उद्देश देखरेख संरक्षण म्हणून असावा असे वाटते.
येथील सुंदरतेला चार चांद पावसाळ्यात लागलेले दिसतात. दोन्ही बाजूने कड्यावरून घरंगळत येणारे दोन धबधबे लेणी संपताच एकमेकांना अलिंगण देऊन या लेणी समूहाला आपल्या मिठित घेतल्याचे सुंदर दृष्य पाहून मन भारावून जाते.कधी माणिकडोह धरण दर्शन तेजूर गावाकडून घेण्याची इच्छा झालीच तर या लेण्यांना पाहून नेत्रसुख नक्कीच घ्या.
या अपरिचित लेण्या.श्री. विनायक खोत सर, शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबने जगासमोर आणण्याचा छोटा प्रयत्न केला असून या माणिकडोहच्या बौद्धकालीन लेणी दुर्गप्रेमींसाठी अभ्यासपर्वणी ठरणार आहेत. आपण हा पौराणिक ठेवा जगासमोर आणण्यासाठी पोस्ट लाईक न करता शेर कराल ही सदिच्छा.

लेखक /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल

 

 

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

३५ पर्यटकांची थरारक व धडकी भरवणारी वानरलिंगीवर झेप एक नवीन विक्रमाची नोंद.

आज “निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुज पेज व रेंज अॅडव्हेंचरच्या माध्यमातून जीवधन ते वाणरलिंगी (खडापारशी) २५० फुट व्हॅली क्रॉसिंग तसेच ३३० फुट रॅपलिंगचा भर उन्हाळ्यात अनेक हौसी पर्यटकांनी प्रत्यक्ष थ्रिल थराराचा रोमांचक , धडकन वाढवणारा आनंद घेतला. या मध्ये 7 महीलांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे यामध्ये खोडद गावच्या पाच महिलांनी सहभाग घेऊन जुन्नर तालुक्यात एक वेगळाच इतिहास रचला. या वानरलिंगीवर जुन्नर तालुक्यात प्रथमच या पाच महिलांचे पाउल पडले व यांनी आपल्या भागातील इतर महिलांनी असा धाडसी सहभाग नोंदवावा हा संदेश दिला.
आज या ठिकाणी व्हॅली क्रॉसिंग करण्याचं नवीन रेकॉर्ड रचलं गेलं.३५ ट्रेकर्स ने हि २५० फूट लांब व्हॅली क्रॉस केली व ३३०ल रॅपलिंग केली. हि व्हॅली अतिशय धडकी भरवणारी व भयानक असल्याने सहजासहजी ट्रेकर या व्हॅली क्रॉसिंग इव्हेंट उपक्रम राबवत नाहीत. २०१४ ला पुण्याच्या एका ग्रुप ने हि व्हॅली क्रॉस केल्याची नोंद आहे त्यांच रेकॉर्ड होत २५ गिर्यारोहकांच. त्यानंतर २००८ ला काहींनी हा प्रयत्न केला होता. मात्र आज त्यापेक्षा जास्त म्हणजे 35 पर्यटकांनी हा थरार अनुभवला. …आणि या रेकॉर्डचे आम्ही साक्षीदार आहोत….माळशेज रांगांमध्ये नाणेघाटाच्या कुशीत जीवधनाच्या सोबतीला असलेली वाणरलिंगी गेली अनेक दिवस ऊन, वारा पाऊस झेलत आहे…या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारा असतो आणि पाऊसही यांमुळे वाणरलिंगी ला मधोमध उभे आणि खालच्या बाजूला आडवे तडे गेले आहेत…भविष्यात किती ट्रेकर यावर क्लायबिंग व रॅपलिंगचा आणि क्रॉसिंगच्या थराराला जातील याचा अंदाज सांगू शकत नाही. मला हे रेकॉर्ड पर्यटकांना सहभागी करून घेऊन हा उपक्रम राबविण्याचा विलक्षण आनंद होत आहे. सहभागी सर्व पर्यटकांचे खुप खुप आभार व अभिनंदन.

श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
“निसर्ग रम्य जुन्नर तालुका” फेसबुक पेज