अरे खोप्यामधी खोपा…

अरे खोप्यामधी खोपा

अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाला टांगला

पिलं निजली खोप्यात
जसा झुलता बंगला
तिचा पिलामधी जीव
जीव झाडाले टांगला

खोपा इनला इनला
जसा गिलक्याचा कोसा
पाखरांची कारागिरी
जरा देख रे मानसा

तिची उलूशीच चोच
तेच दात, तेच ओठ
तुले देले रे देवानं
दोन हात दहा बोटं

कवयित्री – संत बहिणाबाई चौधरी

14095733_1741179709470133_5800257537207818704_n

14089004_1741179736136797_1052182764736896151_n

14117766_1741179849470119_8279934122307668408_n

 

 

मी हजारो घरे बांधण्यात मग्न असलेले कामगार पाहीलेत परंतु आज एका जागेवर तीन तास घर कसे विणले जाते हे मात्र या सुगरण पक्षी इंजिनिअरच्या काबाडकष्टातुन पाहीले.
छायाचित्र : श्री खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in