माणिकडोह (जुन्नर) येथील शोध नव्या बौद्धकालीन लेण्यांचा.
जुन्नर शहराच्या पश्चिमेला सात कि.मी अंतरावर डोंगराळ भागात वसलेले छोटेसे गाव म्हणजे माणिकडोह होय. येथे जाण्यासाठी वापरात येत असे ती पुरातन व्यापाराची व नाणेघाटला जाणारी वाट. परंतु काळ बदलत गेला व या पाऊल खुणा व या वाटेचा इतिहास बुडला गेला तो माणिकडोह धरणाखाली. श्री. शिवछत्रपतींच्या दुसर्या सुरतेच्या लुटीतील लुटलेले मानिकरत्न ज्या डोहात बुडावले गेले ते येथील कुकडी नदीच्या डोहात. कुकडी माईच्या पात्रखडकात पाण्याने जवळपास सांदन व्हॅली सारखी ५०० मीटर लांब घळ नैसर्गिक रित्या तयार झालेली असून जवळपास ती ४० ते ५० फुट खोल असून तिच्या तोंडावर बांधलेला यशवंत घाट व गावातील विविध दगडी शिल्प आपणास पुरातन इतिहासात डोकावण्यास भाग पाडतात.
गावाच्या दक्षिणेस जवळच अर्ध्या कि.मी अंतरावर पुर्व, पश्चिम डोंगररांग पसरलेली असून ही रांग पुर्वेकडे तुळजाभवानी लेणी समुहापाशी संपते. परंतु पश्चिमेस गेलेल्या रांगेतील लेणींचादरा म्हणुन नाव असलेल्या ठिकाणी ही लेणी पहावयास मिळते. ज्या ठिकाणी सध्या खडी क्रेशर जे माणिकडोह धरणाच्या भिंतीच्या रेषेत दक्षिणेस दिसून येते त्याच ठिकाणी डोंगराच्या मधभागी वाटीच्या आकारातील कातळात या लेणी कोरलेली दिसून येतात. ही लेणी कोरण्या आधी येथे प्रथमतः पाण्याची दोन टाकी खोदण्यात आल्याचे लक्षात येते. येथील डोंगररांगावर त्याकाळी येथे सहज कंदमुळे उपलब्ध होत असे परंतु पाण्यासाठी मात्र माणिकडोह गावाकडे धाव घ्यावी लागत असेल कारण मानवाच्या दोन मुख्य गरजा म्हणजे अन्न आणि पाणी होय. त्यामुळेच प्रथम येथे टाकी कोरली गेली असावित.
येथील कातळाचा अभ्यास करता या लेणी कोरताना कच्च्या स्वरूपात आढळुन आला व त्या त्या ठिकाणी काम अर्धवट सोडलेल्या खुणा आढळतात.
या लेणीमधून समोरील दृश्य मनाला भुरळ घालणारे असून, माणिकडोह धरण, किल्ले हडसर, हटकेश्वर डोंगररांग व यामधील येणारा सपाट भुभाग न्याहाळता येतो. त्यामुळे येथे लेणी कोरण्या पाठीमागचा उद्देश देखरेख संरक्षण म्हणून असावा असे वाटते.
येथील सुंदरतेला चार चांद पावसाळ्यात लागलेले दिसतात. दोन्ही बाजूने कड्यावरून घरंगळत येणारे दोन धबधबे लेणी संपताच एकमेकांना अलिंगण देऊन या लेणी समूहाला आपल्या मिठित घेतल्याचे सुंदर दृष्य पाहून मन भारावून जाते.कधी माणिकडोह धरण दर्शन तेजूर गावाकडून घेण्याची इच्छा झालीच तर या लेण्यांना पाहून नेत्रसुख नक्कीच घ्या.
या अपरिचित लेण्या.श्री. विनायक खोत सर, शिवाजी ट्रेल व हिस्ट्री क्लबने जगासमोर आणण्याचा छोटा प्रयत्न केला असून या माणिकडोहच्या बौद्धकालीन लेणी दुर्गप्रेमींसाठी अभ्यासपर्वणी ठरणार आहेत. आपण हा पौराणिक ठेवा जगासमोर आणण्यासाठी पोस्ट लाईक न करता शेर कराल ही सदिच्छा.
लेखक /छायाचित्र श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
धन्यवाद
खूप छान माहिती आहे ही, धन्यवाद सर हे app तुम्ही काढलेत आणि माहिती खूपच इंटरेस्टिंग आहे
खूप छान ऐतिहासिक शोध लावलेत !!
या app च्या माध्यमातून आपल्या तालुक्याची माहिती जगासमोर जास्तीत जास्त यावी !!!
👌👌👌good