ऐतिहासिक घाट

ऐतिहासिक घाट
जुन्नर शहराच्या उत्तरेला कुकडीमाईच्या दक्षिण किणार्यावर 450 वर्षापुर्वी बांधण्यात आलेला एक ऐतिहासिक घाट आज अंतिम घटिका मोजत असल्याचे चित्र दिसत आहे.
या घाटाला चार टप्पे करून बांधण्यात आले आहे. साधारण 70 ते 80 फुट लांबीचा व 35 ते 40 फुट रूंदीच्या या घाटाला चार बुरूज व दोन देवळ्या बनवुन उभारण्यात आले आहे. संपूर्ण घाट हा घडीव दगडी तोडीत व चुन्याचा वापर करून बांधण्यात आलेला आहे. पश्चिमेकडील पहिल्या बुरूजाखालील पायर्‍यांचा भाग पश्चिमेकडेच खचल्याने तो साधारण दोन फुट खचला आहे. व सामनी दोन असलेल्या बुरूजांच्या मध्यभागी साधारण दोन फुट चिर पडल्याने येथे भविष्यात अनेक अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
येथील नागरिक या घाटाशी आपले किती जीवाभावाचे नाते आहे ते सांगताना व आज घाटाची झालेली दुरावस्था वर्णन करताना दु:ख व्यक्त करतात.
येथे जुन्नर शहरातील अनेक तरूण छंद आणि व्यायाम म्हणून पोहण्यासाठी येत असतात. कारण शहरातील बांधण्यात आलेला स्विमिंग पूल गेली अनेक महिने बंद अवस्थेत असल्याचे येथील तरूण सांगतात त्यामुळे येथेच नाविलाजास्तव आपला छंद जोपासावा लागतो असे म्हणतात.
कुकडीमाईचा वाहण्याचा झुकता कल या घाटाच्या दिशेला असल्याने पावसाळ्यात प्रचंड वेगाने वाहत येणार्या नदीच्या पाण्यामुळे या घाटाच्या पात्रतील पायर्‍यांखालून पाण्याने त्या खालील माती पाण्याबरोबर वाहुन गेल्याने कपार निर्माण झाली आहे व या कपारीत अडकून येथे पोहण्यासाठी येणाऱ्या तरूणांना धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक गरीब माता भगिनी येथील पात्रात कपडे धुन्यासाठी येथे येत असतात त्यांनाही येथे धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या घाटाची जपवणूक व ऐतिहासिक वारसा टिकवला जावा म्हणून संवर्धन करणे खुप गरजेचे आहे. त्यासाठी योग्य वेळीच जर पाऊल उचलले गेले व संवर्धन केले गेले तर भविष्यात घडणार्‍या अपघाताच्या घटना घडणार नाहीत.
येथील सभोवतालचा परीसर अतिशय नयनरम्य असून नेत्रसुख देणारा आहे. माझ्या निरीक्षण दरम्यान मला भारतात आढळुन येणार्या विविध खंड्या पक्ष्यांपैकी (kingfisher bird) तीन जाती याच घाटाच्या पश्चिम नदिपात्रात उडताना पाहुन अत्यंत आनंद झाला होता. येथे विविध प्रकारचे पक्षी नेहमीच संचार करत असतात. या घाटाचे मनमोहक दृश्य मार्च महिन्यात व जुन्नर शहरातून लेण्याद्रीला जाण्यासाठी जो मध्यमार्गावर नदी पुलाने जोडला आहे त्यावरून खुप छान दिसते. अशा या ऐतिहासिक वास्तूची जपवणूक व येथे अनुभवलेल्या क्षणांचा साक्षीदार असलेल्या या घाटाच्या दुरावस्थेकडे लक्ष देऊन त्यास संवर्धित करण्यात आले तर मोठा अत्यानंद झाल्याशिवाय राहणार नाही.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
वनरक्षक जुन्नर
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
जुन्नर पर्यटन विकास संस्था जुन्नर
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका .

 

13226857_1704109149843856_1166344061351016688_n 13240658_1704109133177191_6574750045059792152_n 13265947_1704109116510526_4799872739217833346_n 13227178_1704109096510528_7095207743982333350_n 13232922_1704109056510532_1729831524050188108_n13254251_1704109029843868_8989976623710206011_n 13265945_1704109003177204_5950796829783521440_n 13165938_1704108959843875_4948221906555886630_n