माझ्या अंगणी शोभे हिरड्याची रांगोळी

माझ्या अंगणी शोभे हिरड्याची रांगोळी.
कालची दिवसभराची भटकंती व त्या भटकंतीतुन दिसलेली विविध दृश्य टिपताना खुप आनंद देणारी होती.
सध्या जुन्नर तालुक्यातील मावळ पट्ट्यात हिरड्याने बहरलेल्या वृक्षाची फळे काढण्याचे काम वेगाने सुरू आहे. फळांनी व पानांनी बहरलेला हा वृक्ष येथील निसर्गाला या दुष्काळात सुद्धा हिरवेपण देऊन नयन सुख देत आहे.
वृक्षाची काढलेली फळे सुखविण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपल्या अंगणी अशा प्रकारे पसरवलेली असतात कि जणू त्या अंगणात एक वेगळीच रांगोळी काढलेली आहे की काय? असे चित्र दिसत आहे. येथील प्रत्येक शेतकरी आपल्या घरी आलेल्या पाहुन्यांना जणू माझ्या अंगणी शोभे हिरड्याची रांगोळी असे सांगतानाचा भास निर्माण होत आहे.
लेखक/ छायाचित्र : श्री.खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)
मो.नं. 8390008370
शिवाजी ट्रेल
फेसबुक पेज- निसर्ग रम्य जुन्नर तालुका

13100705_1698037017117736_6084428545573103131_n 13092186_1698037003784404_6840239001302941506_n 13087570_1698036993784405_8241163232092465222_n