ब्रम्हस्थान…

ब्रम्हस्थान…

घर असो, वाडा असो किंवा मंदिर असो. वास्तुशास्रानुसार घर,वाडा किंवा मंदिर या वास्तूचा मध्यबिंदू म्हणजेच त्या वास्तुचे ब्रम्हस्थान होय. या जागेस अगदी पुर्वी पासुन खुप महत्व दिले गेले आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे वजन पडू नये, पाय पडू नये म्हणून आज मंदिरात त्या ठिकाणी कासव बसविण्यात येते व प्रत्येक जण या कासवाचे दर्शन घेत असतो. आपण अनेक ठिकाणी पाहीलेही असेलच की कासव देवतेच्या समोरच मध्यभागी असते. या मधील काल्पनिक रेषेवरून कधीच दर्शन घेऊ नये.

old-shivai-devi-temple
जुने शिवाई देवी मंदिर
gomukh
गोमुख
stone-pipe-line
दगडी पाईपलाइन
bramhasthan
ब्रम्हस्थान
bramhasthan
ब्रम्हस्थान

अनेक वर्षांनी किल्ले शिवनेरी वरील माताशिवाई देवी मंदिराच्या जिर्णोध्दराचे काम जलद गतीने सुरू आहे. त्यामुळे या मंदिराच्या सभामंडपात उत्खनन सुरू केले व माता शिवाई देवीच्या सभामंडपात असलेले ब्रम्हस्थान उघडकीस आले. ब्रम्हस्थानाच्या ठिकाणी बसविण्यात आलेले कोरीव दगडी शिल्प कि त्या शिल्पाची रचना एका घमेल्यासारखी केलेली असुन त्या भांड्यात दगडात कोरून पाण्याची एक पन्हाळी बनवून मातेच्या स्नानाचे पाणी त्या पन्हळीद्वारे एक होल पाडून त्या ब्रम्हस्थानाच्या भांड्यात सोडण्यात आले आहे, कि ज्या पाण्याचा उपयोग अमृत तीर्थ म्हणून करण्यात येत असे. पुन्हा हे तीर्थ पुर्वेकडे एक होल पाडून दगडी पन्हळीद्वारे काढून देण्यात आले आहे. कि जेणेकरून ते पाणी साठून राहीले जाऊ नये. व मंदिरात उग्र वास पसरू नये. हेच पाणी पुढे गोमुख कोरीव दगडी शिल्पातुन बाहेर सोडण्यात आले आहे.
पुर्वीच्या बांधकाम शैलीचे देखावे पाहताना खुप बारकावे जोपासले गेले तर त्यांचा उलगडा व बांधन्यापाठीमागचे उद्देश आपणास थोडेफार समजू लागतात. त्यासाठी निरीक्षण असणे आवश्यक आहे.
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश
( माजी सैनिक खोडद)
निसर्ग रम्य जुन्नर तालुका