All posts by श्री विनायक साळुंके

कधीही वाचकांनी व कदाचित अभ्यासकांनी न वाचलेला इतिहास…

कधीही वाचकांनी व कदाचित अभ्यासकांनी न वाचलेला व न अनुभवलेला जुन्नर शहराच्या  जवळच 2.5 कि.मी अंतरावर असलेला हा इतिहास…

मित्रांनो मला येथील असलेली थोडीफार माहिती आपणास देताना अत्यंत आनंद होत आहे. परंतु या ठिकाणाचे निरीक्षण करते वेळी जीव धोक्यात येऊ शकत असल्याने त्या परिसराचा उल्लेख करणे योग्य समजत नाही.
आपणास कालच बेलसर ठिकाणी असलेल्या पुरातन शिल्पांबाबत थोडीफार माहिती देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु  माहीती देत असणार्या वास्तू बाबत मी सांगू इच्छितो की हे ठिकाण कमीत कमी चाळीस ते पन्नास फुट लांबीचे असून ते नक्कीच नवव्या शतकातील हेमाडपंथी शिवकालीन मंदिर असाव. कारण कोरीव शिळा उभारणी करीता चौथर्यात खडकात कोरलेले 1.5×1.5 चे खड्डे व इतरत्र आढळणारे  शिल्प, शिवलिंग व येथील वेगवेगळे पुरावे पाहताना ते पुरातन असलेल्या  खात्रीचा दाखलाच देतात.
येथे कोरलेली विहिर काही वेगळ्याच स्वरूपात असुन त्या मध्ये सध्या पाणी भरलेले असून त्यातून किल्ले शिवनेरी कडील बाजूला जाणारा अतिशय मोठा भुयारी मार्ग दिसत आहे. विहीरीचा वरील आकार जरी 3×3 चा दिसत असला तरी अंदाजे ती15 फुट खोल असून किल्याकडील बाजुला कोरत नेलेला आहे. सध्या हा मार्ग टनटनीच्या झुडपांनी वेढलेला आहे.

whatsapp-image-2016-11-28-at-7-41-08-am

whatsapp-image-2016-11-28-at-7-41-07-am

whatsapp-image-2016-11-28-at-7-41-06-am

whatsapp-image-2016-11-28-at-7-41-05-am

whatsapp-image-2016-11-28-at-7-41-04-am
जवळच शिवलिंग व शेजारी तुटलेले अर्ध शिल्प आहे. शिवलिंगा शेजारीच गुहा कोरलेली असून तीचे द्वार अर्धवट मातीने गाडलेले आहे, जवळच ओढा वाहत असल्याने तेथील माती ओली झाल्याने गाळ निर्माण झालेला असून लेणी मध्ये वाकून प्रवेश करता येतो.आत मध्ये मोठी कातळकोरीव गुहा असल्याचे समजते. हा ही मार्ग  वेलींनी वेढलेला असून जीवधन किल्यावर असलेल्या धान्य कोठारावरील असलेले बांधकाम स्ट्रक्चर प्रमाणेच यावरपण बांधकाम केलेल्या खुणा स्पष्ट दिसून येत आहेत.
येथील परीसर फिरून पाहीला असता येथे वेगळेपण अनुभवयास मिळते. या वास्तूच्या बाबत ऐकावयास मिळालेल्या कथा अंधश्रध्देला जन्म देणाऱी असल्याने ती व्यक्त करणे जरुरीचे समजत नाही. कदाचित त्या कथेमुळे या वास्तूचे जीवनच संपुष्टात येऊ शकते.
ही वास्तू अतिशय सपाट भागावर असल्याने येथून जाणारा जवळच 50 मी अंतरावर डांबरी रस्ता कुणालाही अगदी सहज पोहचवू शकतो. त्यामुळे त्या ठिकाणाचा नामोल्लेख टाळून ती माझ्यापुरतीच मर्यादित ठेवत आहे. कारण कुणी ती पाहण्यासाठी केलेला प्रयत्न आपघातास कारणीभूत ठरू शकतो.
ही वास्तू प्रकाश झोतात येण्याकरीता व आपल्याला पाहण्यासाठी त्याची मी प्रत्यक्ष टिपलेली छायाचित्रे आपणास दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.

 साभार –
श्री.खरमाळे रमेश ( माजी सैनिक खोडद )
” निसर्ग रम्य जुन्नर तालुका “
http://www.nisargramyajunnar.in

हबशी महल- हापुसबाग, जुन्नर…

हबशी महल ( हापुसबाग, जुन्नर )
(असंख्य पर्यटकांपासून वंचित इतिहास जुन्नरचा)
जुन्नर प्राचीन ऐतिहासिक कालखंडात जुन्नर हे राजधानीचे केंद्र होते. सातवाहनांचे राजकीय प्रतिस्पर्धी शकक्षत्रप यांची राजधानी होती. टॉमेली या प्रसिद्द ग्रीक लेखकाने जुन्नरला ओमनगर म्हटले असून नंबनस म्हणजे ‘नहपान’ हे आता सिद्ध झाले आहे. अशा या जुन्नर शहराच्या पुर्वेकडे अगदीच दोन कि.मी अंतरावर असलेल्या हापुसबाग गावाच्या उत्तरेस असलेली ही देदीप्यमान वास्तू जवळपास 400 वर्ष ऊन, वारा, पावसाच्या नैसर्गिक कालचक्राशी सामना करीत आजही हा हबशी महल तेवढ्याच दिमाखात उभा असलेला पहावयास मिळतो. साधारणतः 60×150 फुट चौकोनाकृती ही वास्तू कोरीव शिळेतील व चुन्याच्या नक्षिदार बांधकामात तयार केलेली आहे . ही वास्तू, वास्तू शास्त्राचे उत्तम उदाहरणच म्हणावे लागेल. या वास्तूच्या चारही बाजूंनी संरक्षणासाठी मोठमोठ्या भिंती होत्या आज त्या जमीन दोस्त जरी झाल्या असल्यातरी चार बाजुच्या चार दरवाजांचे पुरावे पहावयास मिळतात. चारही बाजूंनी असलेली 200 वर्षाच्या आसपास असलेली मोठमोठी चिंचेची झाडे येथील इतिहास डोळ्यासमोर उभा करण्याचा प्रयत्न करतात.
महलाच्या दक्षिणेस असलेली साधारणतः 30×30 फुटाची चौरसाकृती टाकी व तीचे बांधकाम येथील इतिहास हा वेगळाच असल्याचे संकेत दर्शवीत आहेत.

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-31-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-32-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-32-am1

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-33-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-34-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-36-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-36-am1

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-35-am

whatsapp-image-2016-12-03-at-7-17-34-am1
महलाची रचना तीन टप्प्यात केलेली असून त्यामध्ये आपण उत्तरेकडून प्रवेश करतो. प्रथम आपण मध्य दालनात प्रवेश करून मग पुर्व व पश्चिम दालनात प्रवेश करतो. आतुन तिनही दालने अनेक पद्धतीने चुन्याच्या बांधकाम लेपाने सजवलेली आहेत. पुर्व व पश्चिम दालनाच्या दक्षिणेकडून दोन साधारण दगडी बांधकामातील 25 पायर्‍या चढून वर छताकडे जाण्याचे मार्ग दर्शविलेले आहेत व या इमारतीस उत्तम प्रकारे दुमजली बनविण्याचा प्रयत्न केला गेला आहे. वरील दुमजला व त्यातील खोल्यांचे दरवाजे अतिशय नक्षिदार कोरलेल्या लाकडाच्या चौकटीत केलेले असुन ते आपण किती वेळा न्याहाळून पहाव अस वाटत.
सध्याच्या घडीला या वास्तूचे अनेक ठिकाणी परीवर्तन केलेले असून त्याचे मुळ रूपाचे विदृपीकरण झालेले पहावयास मिळते. या पाठीमागचे काय कारण असावे हे निश्चित माहित नाही. सध्या हे स्थान मालकीचे सांगितले जात आहे. जरीही हे स्थान मालकीचे असले तरी तो एक इतिहासाचा ठेवा म्हणुन नक्कीच जपला जायला हवा अस मला वाटत. कारण याचा इतिहास असा सांगितला जातो कि, सन 1490 च्या कालखंडात बहामनी सुलतानाचा सरदार मलिक अहमद याने जुन्नर परिसरात निजामशाहिची स्थापना केली होती. त्यानंतर वाढत्या साम्राज्याला सोयीस्कर अशा राजधानीसाठी पुढे निजामशाहिची राजधानी नगरला नेण्यात आली. हीच ती इतिहास प्रसिद्ध निजामशाही. निजामशाहितील मातब्बर सरदार शहाजीराजे यांच्याशी अंतर्गत वर्चस्वातून शत्रुत्व पत्करणार्या निजामशहाचा वजीर मलिकांबर याचा संबंध सौदागर मुंबज व हबशी महल या वास्तूशी असल्याचे सांगीतले जाते.
निजामशाहाचा वजीर असलेल्या मलिकांबर हा आफ्रिकेतून भारतात आला होता. तत्कालीन जुन्नर शहरापासून जवळ असलेल्या हबशीबागेत (सध्याचे हापुसबाग ) त्याचे वास्तव्य याच हबशी महलात होते. जुन्नर शहरात त्याने आदर्श अशी मलिकांबर पाणीपुरवठा योजना त्या काळात राबविली होती. त्याचे अवशेष आजही जुन्नर शहरात पहावयास मिळतात. गृहकलहामुळे पित्याविरूध्द बंड करणार्‍या दिल्लीचा शहजादा शाहजान पत्नी मुमताज आणि दोन वर्षाचा औरंगजेब यांच्यासह याच महलात मलिकांबराकडे आश्रयार्थी म्हणुन आल्याचा, राहिल्याचा इतिहास सांगतो.
या राजवाड्याच्या तळ मजल्याची बांधकाम शैली हि मुघल पद्धतीची आहे व पहिल्या मजल्याचे दरवाजे हे पेशवे कालीन बांधकाम शैलीचा नमुना आहे। हबशी घुमब्ज आणि हा महाल यांच्या मध्ये अजूनही काही बांधकाम असण्याची शक्यता आहे। हापूस बाग मधील हा महाल मुघल आणि निजाम शाहितील स्त्रियांच्या जलक्रीडेची जागा म्हणून वापरात होता। मुळचा दक्षिण आफ्रिकेतील हबसाना प्रांतातील गुलाम पण जलतज्ञ असा मलिक अंबर या महालाचा करविता। त्या काळी जेव्हा या राज स्त्रीया जलक्रीडेसाठी इथे उतरायच्या तेव्हा कुठल्याही पुरुषाने पंचक्रोशीत उभे राहू नये म्हणून वाद्य वाजविले जायचे। शिवाजी महाराजांच्या जन्मा आधी 10-12 वर्ष 2-3 वर्षाचा औरंगजेब इथे 2 वर्ष राहिला होता। जुन्नरच्या या मातीने या लहानग्या औरंगजेबाचे पाय जोखले म्हणूनच नियतीने याच मातीत शिवाजी महाराजांना जन्माला घातले।
अशा या वास्तूचा एक ऐतिहासिक वारसा म्हणून पहायला व जपायला हवे अस मला वाटत.
या वास्तूच्या बाबत मी एक 74 वर्षे वय असलेल्या वृद्ध श्री. सिताराम बोर्हाडे यांच्याशी विचारणा केली तर त्यांनी सांगितले की मी ती वास्तू पासष्ट वर्षे झाली तेव्हा पाहीली होती. आज काहीच आठवत नाही. परंतु खुप सुंदर व सुरेख कलाकुसर केली आहे.
मित्रांनो जर आपणास थोडा वेळ असेल तर ही वास्तू पाहण्याची संधी सोडू नका. कदाचीत जुन्नर मध्ये राहून आपण ही कलाकृती जर पाहीली नाहीत तर निश्चितच आपण एका चांगल्या इतिहास पाहण्यास मुकलात असच म्हणाव लागेल. जुन्नर मधुन अगदीच दहा मिनिटांत आपण येथे दुचाकीवरून सहज पोहचु शकता. परंतु येथे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये हीच सदिच्छा व्यक्त करतो.

लेखण / छायाचित्र –
श्री.खरमाळे रमेश, वनरक्षक ( माजी सैनिक खोडद )
निसर्ग रम्य जुन्नर तालुका “
http://www.nisargramyajunnar.in

 

कलियुगातील चमत्कार…

कलियुगातील चमत्कार
एक नाही दोन नाही  तीन नाही तर तब्बल सात बकरांना जन्म दिला एका शेळीने.
जुन्नर तालुक्यातील खोडद गावी घडला चमत्कार. तसा खोडद गावचा नावलौकिक जगाच्या नकाशावर कोरला गेला आहे तो येथील आशिया खंडातील सर्वात मोठी व जागतिक क्रमवारीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या GMRT दुर्बीणीने. परंतु आज जो येथे चमत्कार घडला आहे तो निसर्गाच्या जादुने.  Continue reading कलियुगातील चमत्कार…

पुरातन पंचलींग मंदिर…

पुरातन पंचलींग मंदिर…

(इतिहास जुन्नरचा )
जुन्नर शहरास लागुन पश्चिमेस सर्वात शेवटची ऐतिहासिक वास्तू म्हणजे पंचलींग मंदिर. या वास्तूच्या अगदी 200 मी. अंतरावर पुर्वेस असलेला चौफुला मार्ग की ज्याचा मध्यबिंदू विशाल अशा राजे श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा घोड्यावर स्वार स्मारकाने सजविण्यात आलेला आहे.येथुन एक मार्ग दक्षिणेस किल्ले शिवनेरी, उत्तरेस लेण्याद्री विनायक गिरीजात्मक मार्ग, पश्चिमेस प्रसिद्ध नाणेघाट आपटाळे मार्ग व नारायणगाव या दिशांना जातो. Continue reading पुरातन पंचलींग मंदिर…

ब्रम्हस्थान…

ब्रम्हस्थान…

घर असो, वाडा असो किंवा मंदिर असो. वास्तुशास्रानुसार घर,वाडा किंवा मंदिर या वास्तूचा मध्यबिंदू म्हणजेच त्या वास्तुचे ब्रम्हस्थान होय. या जागेस अगदी पुर्वी पासुन खुप महत्व दिले गेले आहे. या जागेवर कोणत्याही प्रकारचे वजन पडू नये, पाय पडू नये म्हणून आज मंदिरात त्या ठिकाणी कासव बसविण्यात येते Continue reading ब्रम्हस्थान…

लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

(ही पोस्ट लाईक मिळावे या उद्देशाने लिहीली गेली नाही. कृपया विनंती आहे पोस्ट लाईक न करता शेअर करावी कि जेणेकरून ती खुपसार्या वाचकांपर्यत पोहचेल व लेण्याद्री विनायक व लेणी समुहाची माहीती त्यांना समजु शकेल)

जुन्नर तालुका जवळपास सर्व बाजूंनी सह्याद्रीच्या डोंगर रांगानी वेढलेले आहे. व याच रांगांच्या अतिशय परीपक्व व मजबुत बेसाल्ट खडकात अनेक बौध्द कोरीव शैलगृह कोरलेली आढळतात. Continue reading लेण्याद्री (जुन्नर)गणेश लेणी समुह…

किल्ले दौलताबाद वर असलेल्या अवजड तोफांचे निरीक्षण…

किल्ले दौलताबाद वर असलेल्या अवजड तोफांचे निरीक्षण आज विचार करायला लावणारे होते, या तोफांची निर्मिती किल्यावरच केली होती का? असा प्रश्न उपस्थित होतो. कारण किल्यावर जाणाऱ्या मार्गाने या तोफा वर नेने शक्यच नाही असा प्रश्न यांची लांबी व वजन पाहून पडतो.
आपणास काय वाटते नक्कीच आपले मत स्पष्ट करा…

 

14680686_1759845307603573_48623925461492609_n

Continue reading किल्ले दौलताबाद वर असलेल्या अवजड तोफांचे निरीक्षण…

अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..

गेली दोन महिन्यांमध्ये अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..

14915381_1772605302994240_4886860614759860339_n

14907041_1772605269660910_4282316855212179040_n

14937397_1772605249660912_7273648038670369774_n Continue reading अथक परिश्रम घेऊन टिपलेली वाईल्ड लाईफ छायाचित्रे..

तीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट…

आढळून आलेले तीन वेगवेगळ्या रंगाचे डोके असलेले पोपट

14925223_1772736966314407_8974491108652781488_n

14925367_1772736936314410_811917115527139467_n

14955947_1772736872981083_4927686320952203980_n
छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश (माजी सैनिक खोडद)

www.nisargramyajunnar.in