अंबा अंबिका लेणी ( खोरे वस्ती )

अंबा अंबिका लेणी ( खोरे वस्ती )
जुन्नर शहराच्या जवळच 1.5 कि.मी अंतरावर उत्तरेस असलेल्या डोंगर रांगामध्ये 1.5 कि.मी अंतर विस्तार असलेल्या या लेण्या तिन समुहात पहावयास मिळतात. जाण्याचा मार्ग खोरे वस्ती मधुन जो मार्ग दक्षिणेस जातो त्याच मार्गाने पुढे 1 कि.मी अंतरावर गेल्यावर उजवीकडे जी डोंगररांग दिसते तेथेच या लेण्या तीन समुहात विखुरलेल्या दिसतात.साधारणतः येथे 50 कोरीव लेण्या पहावयास मिळतात. विशेष म्हणजे या लेणी जैनतिर्थनकार यांच्या कालखंडातील असुन तीनही लेणी समुह सुंदर अशा कोरीव कलाकृतीत पहावयास मिळतात.
मौर्यानंतर इ.स.पुर्व.184 नंतर ते इ.स 250 पर्यंत नर्मदेच्या खालचा संपूर्ण प्रदेश सातवाहनांनी समृद्ध व भरभराटीला आणला होता. देशविदेशात व्यापार समृध्द केला तो याच सातवाहनांनी. म्हणूनच सातवाहनांची नाणी क्विंटलच्या प्रमाणात मिळतात.
जेव्हा मौर्यांचे प्रांताधिकारी होते तेव्हा पासूनच सातवाहन जुन्नरला राहत होते. मौर्यानंतर त्यांनी आपले स्वातंत्र्य घोषित केले. महाराष्ट्रात 30 सातवाहन राजे होऊन गेले. व यांनीच जवळपास सर्वच लेण्या कोरल्या आहेत. सादवाह, सातवाहन व सप्तकर्णी ही त्यांचीच नावे होय. त्यांची दानपत्रे,नाणी,ग्रंथ व शिलालेख त्यांनी ब्राम्ही , पाली प्राकृत लिपीत लिहिले आहे.
सातवाहन काळ अन्न, वस्र, निवारा, धार्मिक संकल्पना, साहित्य, देश-विदेश व्यापार व लोकजीवनाच्या दृष्टीने खुपच महत्वपूर्ण आहे.
येथील खास भुतलेणी (खोरेवस्ती) वैशिष्ट्य म्हणजे लेणीच्या प्रवेशद्वाराच्या वरच्या भागात दोन स्तुपाच्या मधोमध दोन व्यक्ती कोरलेल्या आपणास दिसून येतात. त्यातील एक व्यक्ती गरूड वंशीय तर एक नागवंशिय आहे. गरूडाचे आणि नागाचे वैरभाव किती प्रसिद्ध आहे हे आपणास ठाऊक आहे. परंतु या काळात हे दोन्ही वैरभाव असलेल्या व्यक्ती एकमेकांना किती आदराने जवळ होत्या की तेव्हा वैरत्वाला विसर पाडणारे तत्वज्ञान शिकविले जात होते असा सांस्कृतिक वारसा जपुन ठेवणार जुन्नर हे ऐतिहासिक शहर होत.
सर्व प्रथम दक्षिणेकडील लेणी समुह पाहुन नंतर जुन्नर शहराच्या दिशेला गेलेल्या पाऊलवाटेने चालत राहिले की याच पाऊल वाटेने दोन्ही समुह पहावयास मिळतात. या लेणी पाहण्यासाठी साधारणतः 3 तास लागतात.परंतु या लेण्या पाहताना शांतता बाळगणे महत्वाचे आहे. कारण येथील लेण्यामध्ये असलेल्या मधमाश्या कॅमेराच्या फ्लॅश व आपल्या आवाजाने उठतात व चावतात. पश्चिमेस उभ्या असलेल्या किल्ले शिवनेरीचे शिवलिंग रूपातील दर्शन मनमोहीत करते. लेण्याद्री गणपती गिरीजात्मजाचे उत्तरेकडे तर हाबसी गोल घुमटाचे पुर्वेकडील दृश्य आपणास आकर्षित केल्या शिवाय राहत नाही.
लेखक / छायाचित्र – श्री. खरमाळे रमेश 
(माजी सैनिक खोडद)
8390008370
वनरक्षक – वन विभाग जुन्नर
उपाध्यक्ष – शिवाजी ट्रेल
सदस्य – माजी सैनिक संघ जुन्नर तालुका
संस्थापक -:निसर्ग रम्य जुन्नर तालुका फेसबुक पेज