कुसुर मधिल अप्रतीम कलाकुसर असलेले मारूती मंदिर.

कुसुर मधिल अप्रतीम कलाकुसर असलेले मारूती मंदिर.

माझी भटकंतीची, संशोधनाची भुख दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्याचे एकमेव कारण आपणच वाचक मित्र आहे. आपल्या येणार्या कमेंट्स व प्रतिसाद माझ्या फाॅलिक अॅसिड टॅबलेटच आहे. म्हणूनच माझी भुक वाढू लागली आहे. त्यामुळे विश्रांती न घेता आपणास जुन्नरचा इतिहास जेवढा शक्य आहे तेवढा उजागर करून तो आपल्या पर्यंत पोहचावा त्यासाठी माझे नेहमीच प्रयत्न असतात.
आज मी श्री. शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म ज्या गावच्या हद्दीतील किल्ले शिवनेरीवर झाला त्या कुसुर गावाला धावती भेट दिली. या धावत्या भेटीत कुसुर गावच्या दक्षिणेस असलेल्या पौराणिक मारूती मंदिराचे निरीक्षण करण्याचे भाग्य लाभले. या मंदिराची घडण अतिशय सुंदर अशा तोडीत केली असुन उत्तर आणि पश्चिमेला दोन घडीव तोडतील प्रवेशद्वारे आहेत. या दोन्ही प्रवेशद्वारांवर दोन घड्याळे कोरण्यात आलेली असुन त्या घड्याळ्यात 9:00 वाजल्याचे दिसत आहे. मला तरी वाटते की ही वेळ म्हणजे मंदिराचा उद्घाटन कालावधी आहे. हे मंदिर जुन्या पद्धतीने बांधलेले असुन उत्कृष्ठ 19 कारागिरांच्या मार्फत याचे निर्माण केले गेले आहे. आत प्रवेश केला तर मारूतीची शिळेतील मुर्ती आपले लक्ष वेधून घेते. हे मंदिर दुमजली असुन छताचा भाग अतिशय सुंदर कोरीव लाकडी नक्षीने बनविण्यात आला आहे. वर दुमजल्यावर जाण्यासाठी असलेला लाकडी जीना स्वतःच्या मजबुतीची आठवण करून देत जशाच्या तसा आपले स्वागत करत उभा आहे. दुमजली भागातून दक्षिकडे असलेल्या वडज धरणाचे अथांग पसरलेले सौंदर्य आपणास भेटीसाठी खुणावत असल्याचा भास निर्माण करताना लक्षात येत.
माझ्या निरिक्षणावरून तरी तालुक्यातील हे एकमेव दगडी कोरीव तोडी व उत्कृष्ट लाकडी कोरीव नक्षी व जुन्या पद्धतीचे बांधलेले व तगधरूण असलेले एकमेव मंदिर असाव. कधी किल्ले शिवनेरीला आलात तर नक्कीच या मंदिराला हल्की भेट देऊन या देव दर्शनाचा आपण आनंद घ्याल हीच सदिच्छा.
छायाचित्र :-श्री. खरमाळे रमेश
(माजी सैनिक खोडद)

मो. नं. 8390008370
12439298_1686555248265913_7328097286724909953_n 12718382_1686555228265915_7000110956244764450_n 12670336_1686555194932585_665985210928619383_n 12670760_1686555154932589_6978532965538476024_n 12920446_1686554874932617_3495821531427476629_n 12670489_1686554794932625_2915236927755825004_n